कोरोना रुग्णांमध्ये घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:23 IST2021-07-18T04:23:17+5:302021-07-18T04:23:17+5:30

लांजा : गेली सहा दिवस कोरोना रुग्णांमध्ये हळूहळू घट होत असल्याने दिलासा मिळाला आहे. शनिवारी तालुक्यात कोरोनाचे केवळ १२ ...

Decrease in corona patients | कोरोना रुग्णांमध्ये घट

कोरोना रुग्णांमध्ये घट

लांजा : गेली सहा दिवस कोरोना रुग्णांमध्ये हळूहळू घट होत असल्याने दिलासा मिळाला आहे. शनिवारी तालुक्यात कोरोनाचे केवळ १२ रुग्ण आढळले आहेत.

कोरोना रुग्णांमध्ये घट होत असल्याने तालुक्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे. शनिवारी करण्यात आलेल्या अँटिजन कोरोना चाचणीत झिरो रुग्ण तर आरटीपीसीआर कोरोना अहवालात एकूण ११ रुग्ण आढळले. शहरामध्ये फिरणाऱ्या नागरिकांच्या चाचणीतून एक कोरोना रुग्ण आढळला आहे. गवाणे गवळीवाडी, कुरंग मधलीवाडी, कुर्णे गाव, देवधे माळवाडी येथे प्रत्येकी दोन, तर गांगरकरवाडी, लांजा वैभव वसाहत आणि बेनी बु. येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.

तालुक्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्या ३५८९ झाली आहे. यातील ३२९० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या तालुक्यात १८० सक्रिय रुग्ण आहेत.

Web Title: Decrease in corona patients