कर्जबाजारी इस्टेट एजंटची आत्महत्या
By Admin | Updated: June 6, 2014 00:14 IST2014-06-06T00:11:52+5:302014-06-06T00:14:18+5:30
जमीन खरेदी-विक्री व्यवहार करणार्या कंपनीत गुंतविलेले पैसे बुडाले

कर्जबाजारी इस्टेट एजंटची आत्महत्या
रत्नागिरी : जमीन खरेदी-विक्री व्यवहार करणार्या कंपनीत गुंतविलेले पैसे बुडाल्याने कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या इस्टेट एजंटने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रशिद कुतुबुद्दिन हकीम (४५) हा असे या मृताचे नाव असून, बुधवारी सायंकाळी ७.३० वाजता रत्नागिरी शहरातील मच्छिमार्केट परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून कर्जदारांचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत असलेला रशिद हकीम याला नैराश्याने घेरले होते. याचा धसका घेऊन त्याने दोरीने गळफास घेतल्याचे आढळून आले. (प्रतिनिधी)