पुरुषाेत्तम नामजाेशी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:32 IST2021-03-27T04:32:09+5:302021-03-27T04:32:09+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद अध्यक्ष पुरुषोत्तम रामचंद्र तथा दादासाहेब नामजोशी ...

Death of Purushattam Namjaeshi | पुरुषाेत्तम नामजाेशी यांचे निधन

पुरुषाेत्तम नामजाेशी यांचे निधन

लाेकमत न्यूज नेटवर्क

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील

माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद अध्यक्ष पुरुषोत्तम रामचंद्र

तथा दादासाहेब नामजोशी (वय ९९) यांचे वार्धक्याने निधन झाले.

आपल्या अखंड जीवनात शिक्षणक्षेत्रासह सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देऊन वकिलीच्या व्यवसायात अनेकांना दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणा दिली. त्यांनी माखजनसारख्या छोट्याशा गावात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतले. पुढे मुंबई येथे कायद्याची पदवी पूर्ण केली. त्यांनी माखजन हायस्कूलमध्ये वर्षभर शिक्षक म्हणून काम केले. मात्र, त्याबद्दल त्यांनी कोणतेही मानधन घेतले नाही. संपूर्ण देशभर गाजलेल्या हर्षद मेहता खटल्यात नामजोशी हे सरकारच्या बाजूने वकील म्हणून उभे राहिले हाेते. सध्या ते मुंबई माटुंगा लोकमान्य हौसिंग सोसायटीमध्ये वास्तव्याला होते. त्यांच्या निधनाने माखजन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व संचालक, शिक्षक, कर्मचारी, ग्रामस्थ यांनी दुःख व्यक्त केले आहे.

Web Title: Death of Purushattam Namjaeshi