नाट्यकलाकार, परीक्षक, यशवंत वैद्य यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:34 IST2021-09-18T04:34:41+5:302021-09-18T04:34:41+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी आकाशवाणीचे उद्घोषक, निवेदक, नाट्य कलाकार यशवंत राजाराम वैद्य (९०) यांचे शुक्रवार कोल्हापूर येथे निधन झाले. राज्य ...

नाट्यकलाकार, परीक्षक, यशवंत वैद्य यांचे निधन
रत्नागिरी : रत्नागिरी आकाशवाणीचे उद्घोषक, निवेदक, नाट्य कलाकार यशवंत राजाराम वैद्य (९०) यांचे शुक्रवार कोल्हापूर येथे निधन झाले. राज्य नाट्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून विविध केंद्रांवर काम पाहिले होते.
ते अनेक वर्षांपासून मुंबई आकाशवाणीत उद्घोषक होते. निवृत्तीपूर्वी ५ वर्षांपासून ते रत्नागिरीत उद्घोषक म्हणून सेवा बजावत होते. येथे ते सेवानिवृत्त झाले आणि अनेक वर्षे येथेच वास्तव्यास होते. त्यांनी अनेक नाटके, श्रुतिका यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांना नाटकांची आवड होती. ज्येष्ठ कलाकार आत्माराम भेंडे, जयंत सावरकर, अंबर कोठारे यांच्यासोबत त्यांनी अनेक नाटकांमध्ये अभिनय केला. रत्नागिरी आकाशवाणीमध्ये आकांत, किनारा नाटकात अभिनय केला. जिणे गंगौघाचे पाणी या कौटुंबिक श्रुतिकेत आकाशवाणी रत्नागिरी केंद्रात काम केले. संगीतकार यशवंत देव, करुणा देव, मंगेश पाडगावकर यांच्यासोबत त्यांचा विशेष स्नेह होता. वैद्य यांच्या पश्चात २ भाऊ, १ बहीण असा परिवार आहे.