लोटेतील जखमींपैकी एकाचा मृत्यू

By Admin | Updated: November 6, 2016 00:37 IST2016-11-05T22:54:28+5:302016-11-06T00:37:08+5:30

सुप्रिया स्फोट प्रकरण : वीस दिवसात औद्योगिक वसाहतीत दुसरा बळी

The death of one of the wounds of the wounds is death | लोटेतील जखमींपैकी एकाचा मृत्यू

लोटेतील जखमींपैकी एकाचा मृत्यू

आवाशी : खेड तालुक्यातील लोटे - परशुराम औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड कंपनीत झालेल्या स्फोटात गंभीर भाजलेल्या दोन कामगारांपैकी प्रितेश गोटल याचा आज (शनिवारी) पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे नातेवाईकांकडून समजले. मागील वीस दिवसात वसाहतीतील हा दुसरा बळी असल्याने कामगारवर्गात भीतीचे वातावरण आहे.
सुप्रिया लाईफ सायन्स कंपनीत दिनांक २५ आॅक्टोबर रोजी दुसऱ्या पाळीत प्लांट सी-एच्या रिअ‍ॅक्टर नं. आर-१००४ येथील तिसऱ्या मजल्यावर मिथॅनॉल चार्ज करण्याचे काम करीत असताना स्फोट झाला होता. यात दोन कामगार गंभीर जखमी झाले होते तर उर्वरित तीनजणांना किरकोळ इजा झाली होती.
गंभीर भाजलेल्या दोघांना ऐरोली (नवी मुंबई) येथील नॅशनल बर्न हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. दरम्यान, आज (शनिवारी) पहाटे यापैकी प्रितेश हरिश्चंद्र गोटल (२३, सोनगाव, ब्राह्मणवाडी) याचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. याबाबत लोटे पोलिसांकडे संपर्क साधला असता, त्यांनीही याला दुजोरा दिला.
दिनांक १५ आॅक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेदिवशी येथील नंदादीप केमिकल कंपनीत टाकीला वेल्ंिडग करण्याचे काम करत असताना, स्फोट होऊन तिवडी, चिपळूण येथील महेंद्र शिंदे (२६) हा जागीच मृत झाला होता. तर त्यापाठोपाठ दहा दिवसाने सुप्रिया कंपनीत रिअ‍ॅक्टरचा स्फोट झाला होता.
या वीस दिवसात लोटे वसाहतीतील दोन कंपन्यांमधील स्फोटात दोन कामगारांचा बळी गेला आहे. (वार्ताहर)


गोटल कुटुंबाचा आधारस्तंभच गेला
प्रितेश याचे आई-वडील शेतकरी असून, गावात मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करतात. प्रितेश हा अविवाहित होता. प्रितेशला एक छोटा भाऊ असून, तो शिक्षण घेत आहे. प्रितेश हा दोन वर्षांपूर्वी सुप्रिया कंपनीत ठेकेदारी पद्धतीवर कामाला लागला होता. त्यामुळे सर्व कुुटुंबाचा भार त्याच्यावरच होता.

Web Title: The death of one of the wounds of the wounds is death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.