शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: गुहागरात खाडीत पडून खलाशाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 16:25 IST

गुहागर : खाडीच्या पाण्यात पडून खलाशाचा मृत्यू झाल्याची घटना पडवे वरचा माेहल्ला (ता. गुहागर) येथे रविवारी (३१ डिसेंबर) दुपारी ...

गुहागर : खाडीच्या पाण्यात पडून खलाशाचा मृत्यू झाल्याची घटना पडवे वरचा माेहल्ला (ता. गुहागर) येथे रविवारी (३१ डिसेंबर) दुपारी घडली. संताेष सखाराम रसाळ (३५, रा. मासू, गणेशवाडी, गुहागर) असे त्याचे नाव आहे.संताेष रसाळ हा शरफुल्ला हुसेन मिया माखजनकर यांच्या बाेटीवर काम करत हाेता. रविवारी दुपारी त्याच्यासाेबत काम करणाऱ्या सहकाऱ्याने त्याला जेवायला बाेलावले. मात्र, संताेष याने ‘मला भूक नाही तुम्ही जेवून घ्या’ असे सांगितले. त्यामुळे त्याचा सहकारी जेवायला गेला. त्यानंतर दुपारी १:४३ वाजण्याच्या दरम्यान पाण्यात काहीतरी पडल्याचा आवाज आला. ते पाहण्यासाठी त्याचा सहकारी गेला. त्यावेळी संताेष हा पाण्यात पाेहत असल्याचे सहकाऱ्याला कळले. मात्र, थाेड्या वेळाने ताे पाण्यात बुडत असल्याचे त्याच्या लक्षात आले.

त्यानंतर सहकाऱ्यांनी किनाऱ्यावरील लाेकांना आवाज देऊन वाचविण्यासाठी हाक मारली. लाेकांनी घटनास्थळी धाव घेऊन संताेष याला पाण्यातून बाहेर काढले. त्याला आबलाेली येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील डाॅक्टरांनी त्याला तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी गुहागर पाेलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नाेंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDeathमृत्यू