वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 10:52 PM2018-10-14T22:52:22+5:302018-10-14T22:52:28+5:30

राजापूर : आडवली-फुफेरे मार्गावर एका अज्ञात वाहनाची धडक बसून साडेतीन ते चार वर्षांचा मादी जातीचा बिबट्या मृत्युमुखी पडल्याची घटना ...

The death of the leopard due to the noise of the vehicle | वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू

वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू

Next

राजापूर : आडवली-फुफेरे मार्गावर एका अज्ञात वाहनाची धडक बसून साडेतीन ते चार वर्षांचा मादी जातीचा बिबट्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. आडवली येथील ग्रामस्थ दिलीप जाधव यांच्या घरापासून जवळ असलेल्या फुफेरे रस्त्याच्या बाजूला हा बिबट्या मृतावस्थेत रविवारी सकाळी आढळून आला. त्यानंतर राजापूर वनविभागाला याची माहिती देण्यात आली.
वनविभागाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी हजर झाले. त्यानंतर मृत बिबट्याची पाहणी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या तोंडातून रक्तवाहत असल्याचे दिसले. अज्ञात वाहनाची धडक बसून तो बिबट्या मृत झाल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मृत बिबट्या हा मादी जातीचा असून, वनविभागाकडून पंचनामा करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मागील काही वर्षांत राजापुरात वाहनांची धडक बसून बिबट्याच्या मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या असून, रविवारी आणखी एक घटना तालुक्यातील आडवली-फुफेरे मार्गावर घडली आहे. तीन महिन्यांपूर्वी एक बिबट्या विहिरीत पडून मृत झाल्याची घटना घडली होती.

Web Title: The death of the leopard due to the noise of the vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.