शोष खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 21:21 IST2018-02-02T21:21:38+5:302018-02-02T21:21:45+5:30

आवाशी : खेड तालुक्यातील लोटे येथील बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या शोषखड्ड्यात तीन वर्षीय बालक पडून मृत्यूमुखी पडले.

 The death of child falling on the toxicity | शोष खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू

शोष खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू

आवाशी : खेड तालुक्यातील लोटे येथील बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या शोषखड्ड्यात तीन वर्षीय बालक पडून मृत्यूमुखी पडले. ही घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी लोटे पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे लोटे बस स्थानकाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या हॉटेल आमंत्रण व यमुना स्वीट मार्ट या दोघांनी मिळून सांडपाणी मुरवण्यासाठी शोषखड्डा मारला आहे.
शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास लवेल येथे राहणारा हसन खान (३) हा बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस खेळत असताना या शोषखड्ड्यात पडला. आजूबाजूला कोणीही नसल्याने तो पडला असल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. त्यामुळे तो गुदमरुन मृत्यूमुखी पडला. याप्रकरणी लोटे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. त्यामुळे याप्रकरणी अधिक माहिती मिळू शकली नाही. आठ दिवसांपूर्वी याच शोषखड्ड्यात अद्वैत दगडू तांबट (५, घाणेखुंट) हा मुलगा पडला होता. परंतु सुदैवाने शोषखड्ड्यात पडल्याची माहिती बाजूने जाणाºया काही पादचाºयांना मिळताच त्यांनी त्याला तत्काळ बाहेर काढले होते.

Web Title:  The death of child falling on the toxicity