शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत राेहयाेच्या उपजिल्हाधिकाऱ्यांवर वाळूमाफियांचा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 13:56 IST

रत्नागिरी : वाळू चोरीचे चित्रीकरण केल्याच्या संशयावरून रत्नागिरीतील रोजगार हमी योजनेच्या उप जिल्हाधिकारी हर्षलता धनराज गेडाम (वय ४९) यांच्यावर ...

रत्नागिरी : वाळू चोरीचे चित्रीकरण केल्याच्या संशयावरून रत्नागिरीतील रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता धनराज गेडाम (वय ४९) यांच्यावर फावड्याने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी शहरातील पांढरा समुद्र येथे घडला. हा हल्ला करणाऱ्या दोघांना गेडाम यांनीच चोप दिला असून, शहर पाेलिस स्थानकात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर वाळू चोरांवर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी मंडळ अधिकाऱ्यांना दिले आहेत.हर्षलता गेडाम शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास रेमंड रेस्टहाऊसच्या मागील बाजूला असलेल्या मुरूगवाडा-पांढरा समुद्र किनाऱ्यावर ‘मॉर्निंग वॉक’साठी गेल्या होत्या. किनाऱ्यावरून त्या समुद्राचे चित्रीकरण करत होत्या. याचवेळी पांढरा समुद्र येथे दोन सफेद रंगाच्या गाड्या वाळू भरून जात होत्या तर एक लाल रंगाचा ट्रक मिरकर वाड्याच्या दिशेने उभा होता. त्यामध्ये काही व्यक्ती वाळू भरत होत्या.

गेडाम या समुद्राचे चित्रीकरण करत असताना वाळू भरणाऱ्या गाडीतील एकजण त्यांच्या दिशेने आला. त्याने ‘तुम्ही आमच्या गाड्यांचे फोटो का काढताय?’ असे विचारले. यावेळी त्यांनी ‘मी समुद्राचे चित्रीकरण करतेय. तुमच्या गाड्यांचे चित्रीकरण केलेले नाही,’ असे सांगून त्या रेस्टहाऊसच्या दिशेने चालत निघाल्या. त्याचवेळी तिसरी सफेद रंगाची बोलेरो पिकअप गाडी त्यांच्याजवळ येऊन थांबली. त्या गाडीतून दोघे खाली उतरले आणि त्यांनी ‘तुम्ही आमच्या वाळू भरलेल्या गाड्यांचे फोटो काढले आहे, चित्रीकरण केले आहे, तुमचा मोबाइल माझ्याजवळ द्या,’ असे सांगत मोबाइल हिसकावून घेण्यासाठी तो जवळ आला.त्याचवेळी त्या थोडे मागे आल्या आणि त्यांनी त्याच्या चेहऱ्यावर कराटे किक मारली. त्यामुळे तो खाली पडला. हे बघून त्याच्यासोबत असलेली अन्य व्यक्ती गाडीतील फावडे घेऊन त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावत आली. त्या थोड्या बाजूला झाल्याने ताे तसाच पुढे गेला आणि त्यांनी त्याच्या पाठीमागून किक मारली. हा सर्व प्रकार किनाऱ्यावर उभ्या असलेल्या गाड्यांमधील काही व्यक्तींनी पाहिला आणि ते धावत तिथे आले. त्याचवेळी गेडाम तिथून निघून आल्या. हल्ला करण्यासाठी आलेल्या गाड्यांचे त्यांनी फोटो काढले असून, ते त्यांनी पाेलिसांकडे दिले आहेत.

हर्षलता गेडाम यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३५२, ३४ नुसार गुन्हा दाखल करुन त्यांचा शाेध सुरु केला आहे.

वाळूमाफियांशी सामनाउपजिल्हाधिकारी गेडाम या मार्शल आर्ट आहेत. त्यांनी तायक्वांदाेच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेले आहे. या प्रशिक्षणामुळेच त्यांनी गुंडांचा हल्ला धिटाईने परतवून लावला. मात्र, या घटनेने वाळूमाफियांची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollectorजिल्हाधिकारीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस