ठेकेदाराला ३१ जानेवारीची डेडलाईन

By Admin | Updated: October 16, 2015 22:44 IST2015-10-16T21:09:59+5:302015-10-16T22:44:04+5:30

चिपळूण शहर : मटण - मच्छी मार्केटचे काम धिम्या गतीने

The deadline for the contractor on January 31 | ठेकेदाराला ३१ जानेवारीची डेडलाईन

ठेकेदाराला ३१ जानेवारीची डेडलाईन


चिपळूण : नगर परिषदेतर्फे शहरातील बाजारपेठेत मटण - मच्छीमार्केट बांधण्याचे काम सुरु आहे. मात्र, हे काम धिम्या गतीने सुरु असल्याने आता संबंधित विभागाने याची दखल घेतली असून, ठेकेदारास ३१ जानेवारी २०१६पर्यंत हे काम पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली आहे.
शहरातील मच्छी व मटण विक्रेत्यांना एकत्रित व्यवसाय करणे सोयीचे व्हावे, या दृष्टीने बाजारपेठेत मटण - मच्छीमार्केट इमारतीचे भूमिपूजन काही वर्षांपूर्वी करण्यात आले. सध्या या भागात व्यवसाय करणारे मटण विक्रेते विविध ठिकाणी व्यवसाय करत आहेत. परंतु, मटण व मच्छी व्यवसाय एकत्रित नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. नगर परिषद प्रशासनातर्फे मटण व मच्छीमार्केट इमारतीचे काम हाती घेण्यात आले. मात्र, या कामास विलंब झाला असल्याने या कामाकडे बांधकाम सभापती बरकत वांगडे व नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांनी लक्ष घातले आहे.
नगरपरिषदेने हाती घेतलेले मटण - मच्छी मार्केटचे काम तातडीने पूर्ण करून मच्छी आणि मटण व्यावसायिकांची होणारी गैरसोय दूर व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या मार्केटचे काम होण्यास दिरंगाई होत असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.
मुदतीत काम पूर्ण व्हावे, अशी शहरवासीयांची अपेक्षा होती. परंतु, हे काम संथ गतीने सुरु असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदाराला ३१ जानेवारीपर्यंत मटण - मच्छी मार्केटचे काम पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली आहे. संबंधित ठेकेदार मुदतीत हे काम करेल अथवा कसे याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)

Web Title: The deadline for the contractor on January 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.