शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
4
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
5
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
6
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
7
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
8
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
9
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
10
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
11
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
12
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
13
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
14
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
15
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
16
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
18
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
19
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
20
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख

Ratnagiri: दाभोळ खाडीत पुन्हा मृत माशांचा खच, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पंचनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 12:03 IST

गेल्या दोन दिवसांपासून खाडीत मृत मासे पाण्यावर तरंगू लागले

चिपळूण : येथील दाभोळ खाडीत वेगवेगळ्या प्रकारची मासळी मुबलक प्रमाणात मिळू लागली असतानाच गेल्या दोन दिवसांपासून खाडीत मृत मासे पाण्यावर तरंगू लागले आहेत. त्यामुळे परिसरातील मच्छीमार धास्तावले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (३१ जुलै) पाहणी करत मृत मासे आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.चिपळूणसह गुहागर, खेड, दापोली अशा चार तालुक्यांत सामावलेल्या या खाडीवर मासेमारी हेच तेथील मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. मात्र, रविवार (३० जुलै)पासून खाडीत मृत मासे पाण्यावर तरंगताना दिसू लागले आहेत. दाभोळ खाडी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला माहिती दिली.त्यानंतर सोमवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी एस. डी. मोरे, क्षेत्र अधिकारी एस. एन. शिंदे, केतकी गावाचे सरपंच महेंद्र भुवड, ग्रामसेवक सूर्यवंशी, तलाठी यू. आर. राजेशिर्के, संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय जुवळे, उपाध्यक्ष प्रभाकर सैतवडेकर, दिलीप दिवेकर, खजिनदार विजय जाधव, ज्येष्ठ सल्लागार शांताराम जाधव, ग्रामस्थ नितीन सैतवडेकर, उपसरपंच रमेश जाधव, राजाराम कासेकर यांनी केतकी येथे जाऊन पंचनामा केला. मृत मासे व पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. हे मासे नेमके कशामुळे मृत झाले आहेत, हे अहवालानंतरच स्पष्ट हाेणार आहे.

खाडीलगतच्या गावांत मासे मृतभिले, सोनगाव, कोतवली, गोवळकोट, घामणदेवी, मेटे, आयनी, शेरी, गांग्रई, बहिरवली, तुंबाड, शिरसी, शिव, मालदोली, होडखाड, पन्हाळजेसह खाडीलगतच्या गावांत मृत मासे आढळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

अनेक वर्षांनंतर खाडीत वेगवेगळ्या प्रकारची मासळी मिळू लागल्याने खाडीत मच्छीमारांच्या दृष्टीने दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून खाडीत मृत मासे आढळणे हे धक्कादायक आहे. याप्रकरणी दोषींवर कारवाई करून मच्छीमारांना नुकसानभरपाई मिळावी.   - प्रभाकर सैतवडेकर, उपाध्यक्ष, दाभोळ खाडी संघर्ष समिती. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी