शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दाऊदची गावाकडील मालमत्ता होणार जप्त; मूल्यांकन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 19:38 IST

मुंबईतील अमिना मेन्शन या शेवटच्या इमारतीचा गेल्यावर्षी लिलाव करण्यात आला होता.

रत्नागिरी : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील विविध मालमत्तांचा लिलाव यशस्वी झालेला असताना उच्च न्यायालयाने आता त्याच्या मूळगावी मोर्चा वळविला आहे. खेड तालुक्यातील मुंबकेयेथील त्याच्या वडीलोपार्जित मालमत्तेचे मूल्यांकन सुरू झाले आहे. दाऊदने 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर परदेशात पलायन केले होते. सध्या तो पाकिस्तानात असल्याचा दावा भारतीय गुप्तहेर यंत्रणांनी केला आहे. 

मुंबईतही त्याच्याविरोधात कारवाई सुरु असून दाऊदच्या विविध मालमत्ता जप्त करण्यात येत आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार दाऊदचे रत्नागिरीतील मूळ गाव मुंबकेयेथे पोलिसांसह महसूल विभागाचे पथक पोहोचले असून त्याच्या संपत्तीचे मोजमाप सुरु करण्यात आले आहे. लवकरच ही संपत्ती जप्त करण्यात येणार आहे. मुंबके येथे तीन मजली इमारत, पेट्रोल पंपासाठीची जागा तसेच बाग अशी मालमत्ता मुंबके येथे आहे. ही मालमत्ता दाऊदची बहीण हसिना पारकर तसेच दाऊदच्या आईच्या नावावर आहे.

मुंबईतील अमिना मेन्शन या शेवटच्या इमारतीचा गेल्यावर्षी लिलाव करण्यात आला होता. या लिलावात ३.५१ कोटीं रुपये प्राप्त झाले होते. दाऊद इब्राहिम 1993मधल्या मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी आहे. या दहशतवादी हल्ल्यात 257 मुंबईकरांना स्वतःच्या प्राणांना मुकावं लागलं होतं. तसेच अनेक जण जखमीही झाले होते. या हल्ल्यानंतर दाऊद इब्राहिम देश सोडून पळाला. 2012मध्ये सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात सुनावणी करताना अमिना कासकर आणि हसिना पारकर यांना मालमत्तेचे दस्तावेज दाखवण्यास सांगितले होते.

परंतु दोघींनाही मालमत्तेचे दस्तावेज न्यायालयात सादर करता आलेले नव्हते. दाऊदच्या आई- बहिणीच्या नावावर मुंबईतल्या उच्चभ्रू वस्तीत 7  मालमत्ता आहेत. ज्यातील दोन अमिना यांच्या नावावर होत्या, तर 5 मालमत्ता हसिना पारकर यांच्या नावे होत्या. दाऊदला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनंही जागतिक दहशतवादी घोषित केलं आहे. दक्षिण मुंबईतलं दाऊदचं एक हॉटेल आणि गेस्ट हाऊसचा सरकारनं पहिलाच लिलाव केला आहे. भारताच्या आग्रहाखातर इतर देशांनीही दाऊदची मालमत्ता जप्त करण्याच्या कारवाईला सुरुवात केली आहे.

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमSupreme Courtसर्वोच्च न्यायालयHigh Courtउच्च न्यायालयKhedखेड