शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

दाऊदच्या लोटेतील भूखंडाचा १ डिसेंबरला लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 20:10 IST

Dawood Ibrahim, khed, ratnagirinews अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचे मूळगाव असलेल्या मुंबके (ता. खेड) येथील वडिलोपार्जित सहा मालमत्तांच्या करण्यात आलेल्या लिलावानंतर लोटे येथे पेट्रोल पंपासाठी खरेदी केलेल्या भूखंडाचा १ डिसेंबरला लिलाव होणार आहे. स्मगलिंग ॲण्ड फॉरेन एक्सचेंज मॅनिप्युलेशन व केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली.

ठळक मुद्देदाऊदच्या लोटेतील भूखंडाचा १ डिसेंबरला लिलावकेंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी केली जागेची पाहणी

खेड : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचे मूळगाव असलेल्या मुंबके (ता. खेड) येथील वडिलोपार्जित सहा मालमत्तांच्या करण्यात आलेल्या लिलावानंतर लोटे येथे पेट्रोल पंपासाठी खरेदी केलेल्या भूखंडाचा १ डिसेंबरला लिलाव होणार आहे. स्मगलिंग ॲण्ड फॉरेन एक्सचेंज मॅनिप्युलेशन व केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली.मुंबकेतील दाऊदच्या सातपैकी सहा मालमत्तांची लिलाव प्रक्रिया १० नोव्हेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली. या लिलावात एकूण २२ लाख ७९ हजार ६०० रुपये जमा झाले आहेत. मुंबके गावातील दाऊदचा दुमजली बंगला दिल्लीतील ॲड. अजय श्रीवास्तव यांनी ११ लाख ३० हजाराची बोली लावून व १५३ सर्वे क्रमांकाची मालमत्ता ४ लाख ३ हजार रुपयांना खरेदी केली होती.वकील भूपेंद्र भारद्वाज यांनी दाऊदच्या ४ मालमत्ता लिलावात विकत घेतल्या. लोटे येथील ३० गुंठे व्यावसायिक भूखंडासाठी ६१.४८ लाख राखीव किंमत ठेवण्यात आली होती.

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमRatnagiriरत्नागिरीKhedखेड