शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लेकीचं लग्न ठरलं, घरात तयारीची लगबग; तोच वडिलांना मृत्यूने गाठले, चिपळुणातील दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 15:52 IST

मुलीचे लग्न पाहण्याचे स्वप्न अधुरेच राहिले

चिपळूण : लेकीचे लग्न ही कुठल्याही पित्यासाठी सर्वाधिक आनंदाची गोष्ट असते. चारच दिवसांपूर्वी लग्न ठरले आणि मे महिन्यात लग्नाचा दिवसही निश्चित झाला. आता लग्नाच्या तयारीची लगबग सुरू होत असतानाच पित्याने जगाचा निरोप घेतल्याची गहिवरून आणणारी घटना चिपळूणमध्ये घडली आहे. शहरातील प्रसिद्ध फळविक्रेते, चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती शाखा क्रमांक १ चे सभासद तसेच पाग बौद्ध कॉलनी येथील रहिवासी गौतम सीताराम जाधव (६०) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले.येत्या १० मे रोजी त्यांच्या दुसऱ्या मुलीचे लग्न ठरले होते. अवघ्या चार दिवसांपूर्वीच हे लग्न जुळले होते. घरात आनंद, तयारी आणि स्वप्नांची उधळण सुरू असतानाच वडिलांचे असे अचानक जाणे, ही घटना कुटुंबासाठी अत्यंत आघात करणारी ठरली आहे. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर, हॉटेल आरंभशेजारी अनेक वर्षे फळविक्रीचा व्यवसाय करून गौतम जाधव यांनी प्रामाणिक कष्टाच्या जोरावर आपल्या तीनही मुलींचे शिक्षण पूर्ण केले. तिन्ही मुली पदवीधर असून, मोठ्या मुलीने फार्मसीची पदवी घेतली आहे. तिने नवी मुंबई येथे स्वतःचे मेडिकल सुरू करून स्वावलंबनाचे उदाहरण घालून दिले. दुसऱ्या मुलीच्या विवाहाची तारीख ठरली होती आणि घरात आनंदाचे वातावरण नांदत होते.गौतम जाधव हे दिवंगत पत्रकार उत्तमकुमार जाधव, हर्षवर्धन गायन पार्टीचे गायक दिवंगत अनंत जाधव आणि चिपळूण नगर परिषद कर्मचारी प्रीतम जाधव यांचे बंधू होत. तसेच हॉटेल आरंभचे मालक हेमंत अनंत जाधव यांचे ते चुलते होत. त्यांच्या अचानक जाण्याने केवळ जाधव कुटुंबच नव्हे, तर परिसरातील व्यापारी, ग्राहक आणि परिचितांमध्येही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मनमिळाऊ स्वभाव, कष्टाळू वृत्ती आणि कुटुंबासाठी अखंड झटणारा पिता म्हणून गौतम जाधव यांची ओळख होती.त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. आनंदाच्या उंबरठ्यावर उभे असलेले घर एका क्षणात शोकसागरात बुडाले असून, ‘मुलीचे लग्न पाहण्याचे स्वप्न अधुरेच राहिले,’ अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Joy turns to tragedy: Father dies before daughter's wedding.

Web Summary : In Chiplun, a father, Gautam Jadhav, unexpectedly passed away just days before his daughter's wedding. The family was immersed in wedding preparations when this heartbreaking event occurred. Jadhav, a fruit vendor, is survived by his wife and three daughters. The community mourns his sudden loss.