लायन्स क्लब ऑफ न्यू रत्नागिरीच्या अध्यक्षपदी दर्शन पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:35 IST2021-09-05T04:35:09+5:302021-09-05T04:35:09+5:30
रत्नागिरी : लायन्स क्लब ऑफ न्यू रत्नागिरीच्या अध्यक्षपदी दर्शन पवार यांची निवड करण्यात आली आहे. सचिवपदी सुनील पुरबिया तर ...

लायन्स क्लब ऑफ न्यू रत्नागिरीच्या अध्यक्षपदी दर्शन पवार
रत्नागिरी : लायन्स क्लब ऑफ न्यू रत्नागिरीच्या अध्यक्षपदी दर्शन पवार यांची निवड करण्यात आली आहे. सचिवपदी सुनील पुरबिया तर खजिनदार म्हणून श्रीकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण साेहळा नुकताच पार पडला.
या सोहळ्याला पदग्रहण अधिकारी म्हणून विभागीय अध्यक्ष गुलाम पारेख, प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रीक्ट गव्हर्नर उदय लोध तसेच संजू पटेल आणि प्रमोद खेडेकर उपस्थित होते. मावळते अध्यक्ष गिरीष तोरस्कर यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. मावळते सचिव प्रसाद हातखंबकर आणि खजिनदार नितीन कुलकर्णी यांनी या सोहळ्यासाठी मेहनत घेतली.
नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्ष जयश्री जोशी, नितीन कुलकर्णी, टेमर राजकुमार मुधळ, सहसचिव जान्हवी पवार, सहखजिनदार नेहा तोरस्कर, टेलटीस्टर प्रदीप मोरे, जी. एस. टी. अध्यक्ष प्रसाद हातखंबकर, जी. एम. टी. अध्यक्ष प्रवीण मलुष्टे, जी. एल. टी. अध्यक्ष जयंत जोशी, जी. ए. टी. अध्यक्ष सूर्यकांत जाधव, एल. सी. आय. एफ. कॉर्डिनेटर गिरीष तोरस्कर, मार्केटींग ॲण्ड कम्युनिकेशन चेअरपर्सन धनश्री पालांडे, संचालक गिरीष तोरस्कर, सूर्यकांत जाधव, धीरज वेल्हाळ, तुषार खानविलकर, नदीम काझी, जान्हवी पवार, प्रवीण मलुष्टे, जयंत जोशी यांचा समावेश आहे.