दापोली अर्बन देणार निराधार, वृद्धांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST2021-07-02T04:22:03+5:302021-07-02T04:22:03+5:30
दापोली : आपल्या सभासदांसाठी नावीन्यपूर्ण योजना जाहीर करणाऱ्या दापोली अर्बन बँकेने निराधार व वृद्धांना उतारवयात आधार देणारी नवी कर्ज ...

दापोली अर्बन देणार निराधार, वृद्धांना आधार
दापोली : आपल्या सभासदांसाठी नावीन्यपूर्ण योजना जाहीर करणाऱ्या दापोली अर्बन बँकेने निराधार व वृद्धांना उतारवयात आधार देणारी नवी कर्ज योजना जाहीर केली असून, या योजनेत आयुष्याच्या शेवटपर्यंत औषधोपचार व अन्य बाबींसाठी दापोली अर्बन पैसे देणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा दापोली अर्बनचे अध्यक्ष जयवंत जालगांवकर यांनी केली.
दापोली अर्बन बँकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बँकेचे अध्यक्ष जालगांवकर म्हणाले की, या योजनेमध्ये ६० वर्षे पूर्ण केलेली व्यक्ती किंवा पॅरालिसिस किंवा ७० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेली ५५ वर्षांवरील व्यक्ती सहभागी होऊ शकते. या योजनेसाठी या व्यक्तीने आपली स्थावर मालमत्ता तारण ठेवणे गरजेचे असून, जास्तीत जास्त १५ लाखांपर्यंत कर्ज घेणे शक्य होणार आहे. हे कर्ज कर्जदार अथवा त्यांचे वारस अंशतः किंवा पूर्णतः मुदतीपूर्वी केव्हाही फेडू शकणार आहेत. या योजनेमुळे अनेक वृद्ध दाम्पत्याला फायदा होणार असल्याचा दावा जालगांवकर यांनी यावेळी केला. या पत्रकार परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी थोरात, उपाध्यक्ष संदीप दिवेकर व संचालक मंडळ उपस्थित होते.