दापोलीत ‘फ्रेंडशिप नारी गरीमा सन्मान २०१४’

By Admin | Updated: December 12, 2014 23:52 IST2014-12-12T21:57:13+5:302014-12-12T23:52:53+5:30

यानिमित्त तब्बल १०० युवतींचा कथ्थक नृत्यावर आधारित चित्रपट गीतांवरील नृत्याविष्काराचा बहारदार कार्यक्रम

Dapoli 'Friendship Women Garima Samman 2014' | दापोलीत ‘फ्रेंडशिप नारी गरीमा सन्मान २०१४’

दापोलीत ‘फ्रेंडशिप नारी गरीमा सन्मान २०१४’

दापोली : येथे उद्या (दि. १३) फ्रेंडशिप नारी गरीमा सन्मान कार्यक्रम होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा वारसा जतन करण्यासाठी फ्रेंडशिप, दापोली ही संस्था गेली २५ वर्षे कार्यरत आहे. याच पार्श्वभूमीवर उपरोक्त सर्वच क्षेत्रात वेगवेगळ्या माध्यमातून फ्रेंडशिप आपले कार्य निस्वार्थपणे करीत आहे. यावर्षी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त ‘फ्रेंडशिप नारी गरीमा सन्मान २०१४’ या कार्यक्रमात ज्येष्ठ संपादक डॉ. उदय निरगुडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दापोली तालुक्यातील विविध क्षेत्रांतील २५ कर्तव्यदक्ष स्त्रियांचा यथोचित सत्कार केला जाणार आहे.
यानिमित्त तब्बल १०० युवतींचा कथ्थक नृत्यावर आधारित चित्रपट गीतांवरील नृत्याविष्काराचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सामाजिक व जाणीव जागृतीचा वारसा जपला जात आहे.
शनिवार, दि. १३ डिसेंबर २०१४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता येथील मराठा बोर्डिंगच्या पटांगणावर हा सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विकास रेळेकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Dapoli 'Friendship Women Garima Samman 2014'