डान्सिंग स्टार ऑनलाइन नृत्य स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:35 IST2021-09-05T04:35:07+5:302021-09-05T04:35:07+5:30
रत्नागिरी : येथील नृत्याविष्कार आणि ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर पुरस्कृत डान्सिंग स्टार ऑनलाइन जिल्हास्तरीय सोलो डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात ...

डान्सिंग स्टार ऑनलाइन नृत्य स्पर्धा
रत्नागिरी : येथील नृत्याविष्कार आणि ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर पुरस्कृत डान्सिंग स्टार ऑनलाइन जिल्हास्तरीय सोलो डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १२ वर्षांखालील आणि १२ वर्षांवरील अशा दोन गटांत होणार आहेत.
ऑनलाइन डान्सिंग स्टार स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी कलाकाराला नृत्याचे व्हिडीओ टेलिग्रामद्वारे पाठवावेत. नृत्याचा व्हिडीओ तीन मिनिटांपेक्षा जास्त असू नये आणि व्हिडीओ एडिट केलेला नसावा. कलाकारांनी त्यांचा व्हिडीओ २० सप्टेंबरपूर्वी पाठवावा. सर्वोत्कृष्ट १० स्पर्धकांचे डान्स व्हिडीओ हे नृत्याविष्कार प्रदर्शित होणार आहेत. प्रथम क्रमांकाला २,०२१ रुपये आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकाला १,५२१ आणि प्रमाणपत्र आणि तृतीय क्रमांकाला १,०२१ रुपये व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीतजास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन नृत्याविष्कार संस्थेच्या संचालिका आसावरी आखाडे यांनी केले आहे.