चिपळूण : महिलांवर होणारा अन्याय, अत्याचार किंवा इतर गुन्ह्यांमध्ये घट व्हावी, महिलांना समाजात सक्षमपणे जगता यावे, या हेतूने जिल्हा पोलीस दलाने दामिनी महिला पोलीस स्कॉडची स्थापना केली आहे. या स्कॉडचा मंगळवारी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तहसीलदार वृषाली पाटील व नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांच्याहस्ते चिपळूणमध्ये प्रारंभ करण्यात आला.स्त्री व पुरुष समान असून, महिलांवर आजही अनेक अत्याचार केले जातात. त्यावर नियंत्रण यावे, पुरुषांप्रमाणेच समाजात महिलांना मानसन्मान मिळावा, त्यांना एकटेपणा वाटू नये, अडचणीच्या काळात त्यांना संरक्षण मिळावे, या हेतूने बीटमार्शल कार्यरत झाले आहे. त्याचा प्रारंभ मंगळवारी चिपळुणात झाला. या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, सभापती स्नेहा मेस्त्री, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा अध्यक्षा चित्रा चव्हाण, तहसीलदार वृषाली पाटील, नगरसेवक सुरेखा खेराडे, नगरसेविका रिहाना बिजले, आदिती देशपांडे, रुक्सार अलवी, लायनेस क्लबच्या अध्यक्षा गौरी रेळेकर, माजी अध्यक्षा सीमा चाळके यांच्यासह महिला दक्षता समितीच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या. यावेळी डीवायएसपी गावडे व पोलीस निरीक्षक मकेश्वर यांनी बीटमार्शल संकल्पनेची माहिती दिली. नगराध्यक्षा, तहसीलदार, सभापतीसह जिल्हाध्यक्षा चव्हाण, नगरसेविका खेराडे, बिजले, देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. बीटमार्शलमुळे महिलांना समाजात निर्भयपणे वावरता येईल. आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, असे सांगून पोलीस दलाचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला पोलीस सुजाता सावंत यांनी केले. लायनेस क्लबतर्फे गुलाबपुष्प देऊन सर्व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. (प्रतिनिधी)गर्दीच्या ठिकाणी गस्तमहिला आणि मुलींबाबत गर्दीच्या ठिकाणी वाईट प्रकार केले जातात. त्यामुळे त्याठिकाणी या बीटमार्शलची गस्त राहणार आहे. विशेषकरून बसस्थानक, रेल्वेस्थानक, शाळा, महाविद्यालये, आदी ठिकाणी ही गस्त राहणार आहे.रेल्वे स्टेशन, एस. टी. स्टँड, शाळा, महाविद्यालय आदी गर्दीच्या ठिकाणी गस्त घालणार महिलांचे तंटे बखेडे किंवा काही अडचणी उद्भवल्यास महिला घेणार तत्परतेने धाव महिलांच्या सुरक्षेसाठी महिला बीटमार्शलचा होणार प्रभावी उपयोग
चिपळूणमध्ये दामिनी पोलीस स्कॉड
By admin | Updated: March 9, 2016 01:21 IST