कोकरे, असुर्डे परिसरात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:32 IST2021-05-18T04:32:37+5:302021-05-18T04:32:37+5:30

असुर्डे : ताेक्ते वादळाचा फटका चिपळूण तालुक्यातील असुर्डे कोकरे पंचक्रोशीमध्येही बसला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंबे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. काही ...

Damage to Lamb, Asurde area | कोकरे, असुर्डे परिसरात नुकसान

कोकरे, असुर्डे परिसरात नुकसान

असुर्डे : ताेक्ते वादळाचा फटका चिपळूण तालुक्यातील असुर्डे कोकरे पंचक्रोशीमध्येही बसला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंबे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले.

काही शेतकऱ्यांनी पावसाळी जनावरांसाठी लागणारे वैरण गोठ्यात भरून न ठेवल्याने ते भिजून गेले आहे. तर काही शेतकऱ्यांनी पावसाळी इंधन म्हणून लागणारी जळाऊ लाकडे सुरक्षित ठिकाणी न भरल्याने ती भिजली आहेत. तर अनेक घरांची अर्धवट कामे राहिल्यामुळे संपूर्ण संसार भिजला गेला आहे. तर काही ठिकाणी गोठे व सभामंडप यावर झाडाच्या फांद्या पडून नुकसान झाले आहे.

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक छोटी-मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. तर सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे गावातील छोट्या नद्या व नाले यांना पाण्याची पातळी वाढण्याच्या मार्गांवर आहेत. जुलै महिन्यात बरसणाऱ्या पावसासारखा हा पाऊस असल्याने अनेक शेतात पाणीच पाणी तुंबलेले होते.

Web Title: Damage to Lamb, Asurde area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.