पाेलीस अधीक्षकांकडून नुकसानीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:30 IST2021-05-17T04:30:37+5:302021-05-17T04:30:37+5:30

रत्नागिरी : तौक्ते वादळामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे़ या नुकसानीची माहिती मिळताच पाेलीस अधीक्षक डाॅ़ ...

Damage inspection by Paelis Superintendent | पाेलीस अधीक्षकांकडून नुकसानीची पाहणी

पाेलीस अधीक्षकांकडून नुकसानीची पाहणी

रत्नागिरी : तौक्ते वादळामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे़ या नुकसानीची माहिती मिळताच पाेलीस अधीक्षक डाॅ़ माेहितकुमार गर्ग आणि पाेलीस निरीक्षक अनिल लाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली़

तालुक्यात शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मिरजोळे गावचे उपसरपंच राहुल पवार यांच्या घराच्या पत्रा शेडवर आंब्याच्या झाडाची फांदी पडली. त्यामुळे विद्युत तारा तुटून पडल्या आहेत. तसेच नाचणे-सह्याद्रीनगर येथील मनोज भगवान खामकर यांच्या घरासमोरील शेडवर नारळाचे झाड पडल्याने शेडचे नुकसान झाले़, तर अंगणात उभी करून ठेवलेल्या रिक्षाचेही नुकसान झाले़ पोलीस प्रशासनाकडून या हद्दीत गस्त सुरू आहे़ तसेच शहरातील भाट्ये येथे रस्त्यावर झाडे पडली होती़ पोलीस मित्र यांनी ही झाडे बाजूला करून रस्ता पूर्णपणे मोकळा केला.

Web Title: Damage inspection by Paelis Superintendent