शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

 तिवरे धरणफुटी : आजारी असतानाही ते कर्तव्यात मग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 14:47 IST

तिवरे (ता. चिपळूण) भेंदेवाडीत फुटलेल्या धरणात बुडालेल्यांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) अथक काम करीत आहे. मुसळधार पाऊस आणि पुराचे पाणी यात अगदी गळ्यापर्यंतच्या पाण्यात, तर कधी झाडाझुडुपात ही शोधमोहीम सुरू आहे. यामुळे अनेकजण आजारी पडत आहेत. मात्र, तरीही तात्पुरत्या औषधोपचारानंतर पुन्हा आपल्या शोधकार्यात मग्न होत आहेत.

ठळक मुद्दे तिवरे धरणफुटी : आजारी असतानाही ते कर्तव्यात मग्नमुसळधार पाऊस, पुराच्या पाण्यात शोधमोहीम

रत्नागिरी : तिवरे (ता. चिपळूण) भेंदेवाडीत फुटलेल्या धरणात बुडालेल्यांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) अथक काम करीत आहे. मुसळधार पाऊस आणि पुराचे पाणी यात अगदी गळ्यापर्यंतच्या पाण्यात, तर कधी झाडाझुडुपात ही शोधमोहीम सुरू आहे. यामुळे अनेकजण आजारी पडत आहेत. मात्र, तरीही तात्पुरत्या औषधोपचारानंतर पुन्हा आपल्या शोधकार्यात मग्न होत आहेत.मंगळवारी रात्री या दुर्घटनेची माहिती कळताच सिंधुदुर्ग आणि पुणे येथील एनडीआरएफच्या बटालियन ५च्या दोन तुकड्या दलप्रमुख सच्चिदानंद गावडे यांच्या नेतृत्त्वाखाली बुधवारी तातडीने तिवरेत दाखल झाल्या. गेले सहा दिवस या जवानांची शोधमोहीम सुरू आहे. २३ पैकी २० मृतदेह सापडले आहेत. अजूनही तीन जणांचा शोध सुरू आहे.या जवानांची शोधमोहीम सकाळी सात वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत सुरू असते. वादळी पावसाचा जोर आहे. त्यातच या भागात पाणी सातत्याने वाढत आहे. चिखलमय परिस्थिती आहे, अशा प्रतिकूल परिस्थितीतही या जवानांची मृतदेह शोधण्याची धडपड सुरू आहे.गळाभर पाण्यातून, चिखलमय भागातून, झाडीझुडुपातून काम करत असल्याने या वातावरणाचा त्रास काहींना जाणवू लागला आहे. मात्र, ह्यआपदा सेवेत सदैवह्ण हे ब्रीद घेऊन काम करणारे हे जवान आजारपण तात्पुरत्या औषधोपचाराने मागे टाकत पुन्हा आपल्या मोहिमेवर जाऊन शोध मोहीम सुरू ठेवत आहेत.आरोग्याची तपासणीया दलाचे सेकंड इन कमांड सच्चिदानंद गावडे सध्या दिल्ली येथे असल्याने या दलाचे नेतृत्व राजेश यावले यांच्याकडे आहे. मात्र, तेही या कामात मागे न राहता स्वत: मोहीमेत अग्रेसर आहेत. ही मोहीम किती दिवस पार पाडावी लागणार, हे अजून तरी अनिश्चित आहे. तरीही ही अवघड मोहीम पार पाडताना या जवानांच्या आरोग्याचा विचारही करणे गरजेचे असल्याने आरोग्य विभागाने त्यांच्याही आरोग्यविषयक तपासणीला प्रारंभ केला आहे.

टॅग्स :DamधरणRatnagiriरत्नागिरी