जिल्ह्यात दहीहंडी केवळ पारंपरिकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:06 IST2021-09-02T05:06:36+5:302021-09-02T05:06:36+5:30
रत्नागिरी : गेली दोन वर्षे दहीहंडी उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. यावर्षीही शासनाची परवानगी नसल्यामुळे दहीहंडीचा उत्सव साधेपणानेच साजरा ...

जिल्ह्यात दहीहंडी केवळ पारंपरिकच
रत्नागिरी : गेली दोन वर्षे दहीहंडी उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. यावर्षीही शासनाची परवानगी नसल्यामुळे दहीहंडीचा उत्सव साधेपणानेच साजरा करण्यात आला. यावर्षीही काेराेनाच्या निर्बंधामुळे पारंपरिकतेने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आल्याने उत्सवातील थरार पहायला मिळाला नाही.
जिल्ह्यात दरवर्षी सार्वजनिक ३५१ व खासगी ३२३९ दहीहंडी बांधण्यात येतात. मात्र, कोरोनामुळे गेले दाेन वर्ष निर्बंध घालण्यात आले आहेत. गोकुळाष्टमीनिमित्त विविध मंदिरातून नामसप्ताह, एक्का आयोजित करण्यात येतो. रात्री १२ वाजता जन्मसोहळा साजरा करण्यात येतो. ठिकठिकाणी श्री सत्यनारायण महापूजेचेही आयोजन केले जाते. यावर्षीही केवळ धार्मिक कार्यक्रम, पूजाअर्चा आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनामुळे मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत पूजा, कृष्ण जन्मसोहळा साजरा करण्यात आला. सोशल डिस्टन्सिंग राखत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
रत्नागिरी शहरातील विठ्ठल मंदिरातही माेजक्याच लाेकांमध्ये दहीहंडी फाेडण्यात आली. पालखी प्रदक्षिणा मंदिरांच्या आवारातच घालण्यात आली. राधा-कृष्ण व सवंगड्यांच्या वेशात मात्र बालके सजली होती.