खेकडा चाेरीप्रकरणी दाेघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:33 IST2021-08-23T04:33:39+5:302021-08-23T04:33:39+5:30
रत्नागिरी : शहरातील परटवणे येथील मत्स्यसंवर्धन प्रकल्पातून सुमारे १२ हजार रूपयांचे खेकडे चाेरून नेल्याप्रकरणी पाेलिसांनी मुरूगवाडा येथून दाेघांना ताब्यात ...

खेकडा चाेरीप्रकरणी दाेघे ताब्यात
रत्नागिरी : शहरातील परटवणे येथील मत्स्यसंवर्धन प्रकल्पातून सुमारे १२ हजार रूपयांचे खेकडे चाेरून नेल्याप्रकरणी पाेलिसांनी मुरूगवाडा येथून दाेघांना ताब्यात घेतले आहे. त्यांना एक दिवसाची पाेलीस काेठडी सुनावण्यात आली आहे.
पाेलिसांनी मनीष माेहन लाड व सुरेंद्र शशिकांत आडाव (दोघे रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) यांना २१ ऑगस्ट राेजी सायंकाळी ताब्यात घेतले आहे. ही चाेरीची घटना २५ जुलै २०२१ रोजी सायंकाळी ७.३० ते २६ जुलै रोजी २०२१ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान घडली होती.
वरिष्ठ संशोधन केंद्रीय निमखारे मत्स्यसंवर्धन संस्था, चेन्नई यांचा शहरातील परटवणे येथे मत्स्यसंवर्धन प्रकल्प आहे. या प्रकल्पातून ६० खेकडे चोरीला गेले होते. त्यांची किंमत १२ हजार रुपये इतकी होती. पाेलिसांनी ताब्यात घेतलेल्या दाेघांनी या खेकड्यांची चाेरी केल्याची कबुली दिली असून, त्यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हेडकाॅन्स्टेबल दीपक जाधव करत आहेत.