उधाणाच्या भरतीने दाभोळ खाडीचा वाडीलाच धोका
By Admin | Updated: July 4, 2017 19:15 IST2017-07-04T19:15:32+5:302017-07-04T19:15:32+5:30
घराच्या पडवीला हानी : १३ कुटुंबांना सतर्क राहण्याच्या सूचना

उधाणाच्या भरतीने दाभोळ खाडीचा वाडीलाच धोका
आॅनलाईन लोकमत
दाभोळ (जि. रत्नागिरी ), दि. 0४ : दाभोळ गावात झालेल्या जोरदार पावसाने परेश गुजराथी यांच्या घराच्या पडवीला हानी पोहोचवली असून, त्यांचे २ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच दाभोळ खाडीला आलेल्या उधाणाच्या भरतीने गावातील दाभोळकर वाडीला धोका निर्माण झाला आहे.
उधाणाच्या भरतीने वाडीतील कृष्णा दाभोळकर व सुनील दाभोळकर यांच्या घरात या भरतीचे पाणी घुसले. प्रथमच अशाप्रकारे उधाणाचे पाणी घरात घुसल्याचे जाणकारांनी सांगितले. त्यानंतर महसूल विभागाने दाभोळकरवाडीला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. भविष्यातील उधाणाचा धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून या वाडीतील १३ कुटुंबांना सतर्क राहण्याच्या सूचना महसूल विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
जुलै आणि आॅगस्ट महिन्यात येणाऱ्या उधाणाच्या भरतीमुळे दाभोळकरवाडीतील घरांना धोका संभवत असल्याने येथील निर्मला दाभोळकर, नंदिनी दाभोळकर, वासंती दाभोळकर, उर्मिला दाभोळकर, यशवंत दाभोळकर, दिलीप दाभोळकर, सुनील दाभोळकर, किशोर दाभोळकर, कृष्णा दाभोळकर, स्वप्नील दाभोळकर, सुनील दाभोळकर, अजय दाभोळकर, राजेंद्र दाभोळकर या कुटुंबियांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.