शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला- शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 11:31 IST

Uday Samant, mumbi univercity, ratnagirinews, educationsector, मुंबई विद्यापीठाच्या अंतिम परीक्षेच्या ऑनलाईन परीक्षेत काहीच गोंधळ झालेला नाही. विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्यामुळे हा सर्व्हर डाऊन झाला. याबाबत मुंबईचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे तक्रार नोंदविण्यात आली असून, याप्रकरणाची चौकशी होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

ठळक मुद्दे विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला- शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहितीमुंबई पोलीस सहआयुक्तांकडे तक्रार

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या अंतिम परीक्षेच्या ऑनलाईन परीक्षेत काहीच गोंधळ झालेला नाही. विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्यामुळे हा सर्व्हर डाऊन झाला. याबाबत मुंबईचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे तक्रार नोंदविण्यात आली असून, याप्रकरणाची चौकशी होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.ते म्हणाले, आॅनलाईन शिक्षणाचा काहीच घोळ नाही. घोळ घालणारेच हा घोळ घालतात. मंगळवारी झालेली परीक्षा ही बाहेरून परीक्षेला बसू इच्छिणाऱ्यांसाठी होती. मात्र, यासाठी कार्यरत असलेल्या सर्व्हरवरच सायबर अ‍ॅटॅक झाला. त्यामुळे ९ हजार विद्यार्थी परीक्षा देत असतानाच एकदम अडीच लाख विद्यार्थी ही लिंक ओपन करताना दिसले. यंत्रणा ठप्प होण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे सामंत यांनी सांगितले. हा सायबर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.ग्रंथालये सुरू होणारलॉकडाऊनमुळे वाचनालये बंद आहेत. अनेक जणांना वाचनालये, ग्रंथालये सुरू होण्याची प्रतीक्षा असून, त्यासाठी मागणी होत आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांत वाचनालये सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.खडसेंनी उद्धव ठाकरेंसोबत काम करावेनाराज एकनाथ खडसे यांनी कुठे जावे, हा त्यांचा प्रश्न आहे. त्याबाबत आपण काही बोलू शकत नाही. ज्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्यावर पक्ष सोडण्याची वेळ यावी, हे दुर्दैवी आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली काम करावे, असे आपल्याला प्रामाणिकपणे वाटत असल्याचे मत सामंत यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरीMumbai Universityमुंबई विद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र