हाणामारीचा कट नियोजितच : सावंत
By Admin | Updated: May 26, 2015 00:52 IST2015-05-25T23:27:02+5:302015-05-26T00:52:50+5:30
या हाणामारीचा कट आमदार भास्कर जाधव समर्थक गटाकडूनच नियोजित

हाणामारीचा कट नियोजितच : सावंत
अडरे : चिपळूण तालुक्यातील तुरंबव गावी ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीचा कट आमदार भास्कर जाधव समर्थक गटाकडूनच नियोजित केला गेला होता, असा आरोप चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांनी आज (सोमवारी) बोलताना केला.
काँग्रेस पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सावंत बोलत होते. यावेळी माजी सरपंच श्रीकांत पवार, महादेव चव्हाण, वसंत झिमण, वैभव विरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सावंत म्हणाले की, हा हल्ला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर झाला आहे.
सत्कार समारंभाच्या वेळी काँग्रेसचे राजा यादव व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी त्यांनाही मारहाण करण्यात आली. हा वाद जाधव कुटुंबाचा होता. यामध्ये जाधव कुटुंबाचे किती लोक जखमी झाले त्यांची नावे जाहीर करावी. हल्ला झाला तेव्हा तुम्ही कोठे होतात? असा सवालही त्यांनी केला. हल्ल्यात जखमी झालेल्या नातेवाईकांना हॉस्पिटलला नेण्यात आले. मात्र, ग्रामस्थांना का नाही नेले ? याबाबत त्यांची वैचारिक क्षमता नाही. हल्ला झाला तेव्हा आमदार जाधव हे काही अंतरावरच होते, असेही सावंत यांनी म्हटले आहे.
या हल्ल्यासाठी चिपळूणची सर्व मंडळी तेथे गेली होती. या हल्ल्याचा काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला आहे. (वार्ताहर)
तुरंबव हल्लाप्रकरणी खरे सूत्रधार आमदार भास्कर जाधवच : सावंत यांचा आरोप.
हल्ल्याचा काँग्रेसने केला निषेध.
जाधव कुटुंबाचे किती लोक जखमी झाली, त्यांची नावे जाहीर करावीत : सावंत यांचे आव्हान.
जखमी नातेवाईकांना रुग्णालयात नेले, मग ग्रामस्थांना का नेले नाही? सावंतांचा सवाल.