शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीपुळ्यात मुंबई, पुण्याचीच गर्दी; अन्य भागातील पर्यटकांची प्रतीक्षाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 11:50 IST

निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर पर्यटकांची संख्या वाढेल असा अंदाज

रत्नागिरी : प्रचंड उष्मा आणि त्यात लाेकसभा निवडणुकीची धामधूम यामुळे सुटीचा हंगाम सुरू हाेऊन अजूनही रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे क्षेत्री येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांची संख्या घटली आहे. सध्या गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये मुंबई, पुण्यातील पर्यटकांची संख्या अधिक आहे. दिवसभरात आठ ते दहा हजार लोक ‘श्रीं’चे दर्शन घेत आहेत.दरवर्षी सर्वसाधारण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पर्यटकांची रेलचेल सुरू हाेते. गणपतीपुळेमध्ये सर्वाधिक पर्यटक मुंबई-पुण्यासह बेळगाव, कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रातून येतात. दरवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला हा पंधरा ते वीस हजार पर्यटक गणपतीपुळे येथे हजेरी लावतात. मात्र, यावर्षी यामध्ये घट झाली आहे. वाढते तापमान आणि त्यातच लाेकसभा निवडणूक यामुळे पर्यटकांची संख्या राेडावल्याचे सांगण्यात येत आहे.मे महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात तिसऱ्या टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडल्याने पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक आलेले नाहीत. काेकणात निवडणुकीसाठी आलेल्या मुंबई, पुण्यातील नागरिकांनी गणपतीपुळेला भेट दिली. मुंबई व पुण्यात चाैथ्या टप्प्यात १३ मे राेजी मतदान हाेणार असल्याने ही मंडळी पुन्हा रवाना झाली आहे.उन्हाच्या कडाक्यामुळे बहुसंख्य पर्यटक थंड हवेच्या ठिकाणी फिरायला बाहेर पडत आहेत. रात्री प्रवास करून दिवसा विश्रांती घेण्यावर अनेकांचा भर आहे. समुद्रकिनारीही उन्हाचा कडाका असल्याने पर्यटकांची संख्या कमी आहे. निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर पर्यटकांची संख्या वाढेल, असा अंदाज आहे.

पर्यटकांची संख्या कमीचमे महिन्याच्या सुटीमध्ये येणाऱ्या पर्यटकांवर गणपतीपुळेतील व्यावसायिकांची उलाढाल होत असते. मात्र, सध्या उकाडा प्रचंड असल्याने पर्यटक येण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे अजूनही पर्यटकांची संख्या कमी आहे. निवडणुकांचा कालावधी संपला की, पर्यटक वाढतील, असा अंदाज व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtourismपर्यटनGanpatipule Mandirगणपतीपुळे मंदिर