शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

Waterfalls in Konkan: चित्ताकर्षक सवतसडा; ‘सवतसडा’ नावाची 'अशी' आहे कहाणी.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 12:25 IST

या ठिकाणाला 'असे' पडले ‘सवतसडा’ नाव

संदीप बांद्रे, चिपळूणपावसाळी हंगामात परशुराम घाट रस्त्याच्या अंतर्गत घळईत घाट चढताना उजवीकडे कोसळणाऱ्या जलप्रपातास म्हणजेच सवतसडा धबधबा. विशेषतः रौद्ररूप धारण करून पावसाळ्यात कोसळणाऱ्या या पांढऱ्या शुभ्र धबधब्याचे दर्शन चित्ताकर्षक ठरते. पावसाळ्यात धबधब्याचा परिसर हिरवाईने नटलेला असतो.चिपळूणपासून सुमारे अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. या धबधब्याच्या माथ्याकडील भाग बाह्यवक्र (ओव्हर हँग) प्रकारचा आहे. त्यामुळे धबधब्याच्या वेगवान जलधारा डोंगर कड्यापासून काही अंतरावर कोसळतात. उंचीवरून कोसळणाऱ्या जलधारांच्या प्रभावामुळे त्याच्या पायथ्याशी डोहासारखा खड्डा तयार झाला आहे. पावसाळ्यात येथे पर्यटकांची खूप गर्दी होते.मुंबईकडून चिपळूणला येताना महामार्गाच्या डाव्या बाजूला हा धबधबा उंचावरून कोसळताना दिसतो. सवतसड्याच्या धबधब्याखाली भिजण्याची मजा लुटण्यासाठी शनिवार-रविवार येथे पर्यटकांची गर्दी असते. जुलै ते ऑक्टोबर या काळात धबधब्याला भरपूर पाणी असते. मात्र, पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह खूप जोरात वाहत  असतो. येथे पर्यटकांसाठी धबधब्यापर्यंत जाण्याकरिता पाऊलवाट असून, विश्रांतीसाठी शेडची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात येथे कायम गर्दी होते. गेल्या काही दिवसांपासून येथे गर्दीचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये केवळ स्थानिक नसून मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासीही हजेरी लावतात.तेव्हापासून बनला ‘सवतसडा’या परिसरातील निवासिनी नावडती स्त्री व आवडती स्त्री या दोघींचे एकमेकांशी सवतीचे नाते होते. एकदा आवडती स्त्री नावडत्या स्त्रीला म्हणाली, तुझी मी आज वेणी-फणी करते. अचानकपणे उफाळून आलेल्या या प्रेम भावनेविषयी नावडतीला आवडतीची शंका आली. प्रत्यक्ष वेणी-फणी घालण्यासाठी त्या कड्यावर बसल्या. त्यावेळी नावडतीने स्वतःच्या पदराची गाठ आवडतीच्या पदराला बांधली. वेणीफणी आटोपल्यावर आवडतीने नावडतीला धक्का देऊन कड्यावरून ढकलले. परंतु, बांधलेल्या गाठीमुळे नावडतीसह आवडतीही कड्यावरून खाली कोसळली गेली. तेव्हापासून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या ठिकाणाला ‘सवतसडा’ असे नाव पडले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtourismपर्यटन