शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

 गुहागर तालुक्यातील व्याघ्रांबरी देवीचा बगाडा उत्सव पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 17:19 IST

गुहागर तालुक्यातील नरवण येथील ग्रामदेवत श्री व्याघ्रांबरी देवीचा बगाडा उत्सव उत्साहात पार पडला. यावेळी भक्तांच्या श्रध्देची परीक्षा घेणाऱ्या बगाडा सोहळ्यासाठी जिल्हाभरातून भक्तांनी गर्दी केली होती. श्री व्याघ्रांबरी देवीचा उत्सव कार्तिक कृ. दर्श अमावास्येला असतो. दरवर्षी देवीचे नवस फेडण्यासाठी भक्त अंगाला आकडे टोचून घेत लाटेवर फिरतात.

ठळक मुद्दे गुहागर तालुक्यातील प्रसिद्ध  उत्सव पाहण्यासाठी भाविकांची गर्दीनरवण येथील ग्रामदैवत श्री व्याघ्रांबरी देवीचा बगाडा उत्सव चढता लाटेवर मानकरी, भाविकही झाले थक्कलाटेवर फिरताना देवीचा जयजयकार

असगोली (ता. गुहागर) : गुहागर तालुक्यातील नरवण येथील ग्रामदेवत श्री व्याघ्रांबरी देवीचा बगाडा उत्सव उत्साहात पार पडला. यावेळी भक्तांच्या श्रध्देची परीक्षा घेणाऱ्यां बगाडा सोहळ्यासाठी जिल्हाभरातून भक्तांनी गर्दी केली होती. श्री व्याघ्रांबरी देवीचा उत्सव कार्तिक कृ. दर्श अमावास्येला असतो. दरवर्षी देवीचे नवस फेडण्यासाठी भक्त अंगाला आकडे टोचून घेत लाटेवर फिरतात. सायंकाळी आकडे टोचणे व लाट फिरवण्याचा कार्यक्रम मंदिराच्या प्रांगणात पार पडला.

गुहागर तालुक्यातील हा बगाडा उत्सव म्हणजे भक्तांची जणू परीक्षाच म्हणावी लागेल. स्वत:चा संपूर्ण देह हा देवीच्या श्रध्देपोटी दोन लोखंडी हुकांवर काही काळ लाटेवर टांगता ठेवणे आणि आपला नवस पूर्ण करणे असे या उत्सवाचे स्वरुप आहे.

भाविकांसाठी हा अपार श्रध्देचा विषय ठरतो. मंदिराच्या प्रांगणात सुमारे तीस फूट उंचीच्या खांबावर तेवढ्याच लांबीची सागवानी लाट फिरवली जाते. ज्या भक्तांचे नवस फेडायचे आहेत, ते स्वत: किंवा देवीचे मानकरी यांच्यामार्फत तो पूर्ण करतात.

यावेळी मानकरींच्या पाठीमागे धातूचे हूक टोचून उंचावरुन फेऱ्या मारणारे मानकरी व नवस फेडणारे भाविक अधांतरी फेऱ्या मारतात तसेच घंटा वाजवत देवीचा नामघोष करत फेऱ्या मारतात.

नवस फेडणाऱ्या भक्तांच्या पाठीला हा आकडा टोचला जातो. आकडा टोचल्यानंतर त्या भागातून कोणत्याही प्रकारे रक्त येत नाही किंवा भक्ताला कोणतीही इजादेखील होत नाही, हे नरवण येथील बगाडा उत्सवाचे खास वैशिष्ट्य आहे. नवस फेडणारे भाविक हे लाटेवरुन पाच फेऱ्या पूर्ण करुन आपला नवस फेडतात.लाटेवर फिरताना देवीचा जयजयकारभक्ताला लाटेवर चढवले जाते. त्याच्या हातामध्ये देवीची मोठी घंटा दिली जाते आणि हा भक्त लाटेवर फिरताना देवीचा जयजयकार करीत असतो. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला असणारे ग्रामस्थ ही लाट प्रांगणात गोलगोल फिरवण्याचे काम करीत असतात. पाच फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर भक्ताला लाटेवरुन खाली घेतले जाते व देवीला नमस्कार केला जातो. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTempleमंदिर