पथदिप खरेदीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार

By Admin | Updated: August 3, 2014 01:56 IST2014-08-03T00:59:57+5:302014-08-03T01:56:02+5:30

जिल्हा परिषद : स्थायी समिती सभेत चौकशीची मागणी

Crores of corruption in Pathdipu | पथदिप खरेदीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार

पथदिप खरेदीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार

रत्नागिरी : पर्यावरण संतुलित ग्राम योजनेतून सौर पथदिप खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार असून त्याची चौकशी करण्याचा मागणी आज झालेल्या जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केली़
अध्यक्षा मनिषा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेली आजची स्थायी समितीची सभा सौरदिप खरेदी भ्रष्टचाराप्रकरणी जोरदार गाजली़ पर्यावरण संतुलित ग्राम योजनेसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी विविध कामासाठी जिल्हा परिषदेकडे देण्यात आला होता़ सुमारे आतापर्यंत १६ कोटी रुपये सौर पथदिप खरेदीसाठी खर्च करण्यात आले़ त्यासाठी वेगवेगळ्या एजन्सीकडून ही खरेदी करण्यात आली होती़
सौरदिप खरेदीसाठीचा निधी ग्रामपंचायतींकडे वर्ग करण्यात आला होता़ मात्र, जिल्ह्यातील हजारो सौरपथदिप बंद पडले असून अनेकांच्या बॅटरी निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोपही यावेळी सदस्य संजय कदम यांनी केला़ यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टचार झाल्याचा आरोप करुन ग्रामपंचायतींची चौकशी करुन त्यांचा अहवाल पुढील सभेसमोर ठेवण्यात यावा, अशी मागणी कदम व अन्य सदस्यांनी सभेत केली़ या प्रकरणी अध्यक्षांनी चौकशीचे आदेश दिले आहेत़
एमआरजीएस व भारत निर्माण योजनेचे प्रस्ताव येत्या १५ आॅगस्टपर्यंत सादर कराव्यात, अशा सूचना अध्यक्षांनी अधिकाऱ्यांना दिल्या़
यावेळी उपाध्यक्ष राजेश मुकादम, शिक्षण व अर्थ सभापती सतीश शेवडे, बांधकाम व आरोग्य सभापती अजित नारकर, समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, महिला व बालकल्याण सभापती स्मिता धामणस्कर व अन्य सदस्य, अधिकारी उपस्थित होते़ (शहर वार्ताहर)

Web Title: Crores of corruption in Pathdipu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.