शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोटीची फसवणूक; गुहागरातील दोघा बिल्डर्संना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 19:40 IST

गुहागर शहरात सदनिका बांधून देतो म्हणून तब्बल १ कोटी १ लाख ४० हजार ३६९ रुपये स्विकारून फसवणूक केल्याप्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील पवार बिल्डर्सचे प्रमुख संतोष पवार याला चिपळूण येथून तर दिपक पवार याला शृंगारतळी येथून गुहागर पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्दे१ कोटीची फसवणूकगुहागरातील दोघा बिल्डर्संना अटक

गुहागर : गुहागर शहरात सदनिका बांधून देतो म्हणून तब्बल १ कोटी १ लाख ४० हजार ३६९ रुपये स्विकारून फसवणूक केल्याप्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील पवार बिल्डर्सचे प्रमुख संतोष पवार याला चिपळूण येथून तर दिपक पवार याला शृंगारतळी येथून गुहागर पोलिसांनी अटक केली आहे.दादर मुंबई येथील पल्लवी सुरेश हेदवकर यांनी याबाबत फिर्याद दाखल केली होती. यामध्ये पवार बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्सने सदनिका बांधून देतो म्हणून आमच्याकडून रुपये १ कोटी १ लाख ४० हजार ३६९ रुपये घेतले. ही सदनिका मुदतीमध्ये बांधून देणार होते. मात्र साठेकरार पत्राप्रमाणे व बुकींगप्रमाणे सदनिका न देता आमचा विश्वासघात केला. एवढेच नाही तर त्यांनी घेतलेले पैसेही दिले नाहीत, असे फिर्यादीत म्हटले होते.याप्रकरणी गुहागर पोलिसांनी पवार बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्सचे भागिदार दिपक काशिराम पवार, संतोष बावकृष्ण पवार, बाळकृष्ण रामचंद्र पवार, शिवानी संतोष पवार, स्नेहा संतोष पवार, (पवारसाखरी, गुहागर), चकोर रामचंद्र्र राऊत (विरार, पालघर), संघमित्रा जितेंद्र्र पवार (काळाचौकी मुंबई), दिनेश विनायक पवार, (पवारसाखरी-गुहागर) यांच्या विरोधात भारतीय दंड विधान ४२०, ४१८, ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्यातील या आठजणांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती. यादरम्यान यातील काही आरोपींनी नी खेड येथील न्यायालयात अटकपुर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्याठिकाणी अर्ज फेटाळला गेला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता. त्याठिकाणी पवार बिल्डर्सचे प्रमुख संतोष बावकृष्ण पवार व दिपक काशिराम पवार या दोघांचा अटकपूर्व जामिन फेटाळला गेला.संतोष पवार हा चिपळूण येथे येणार असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्याला चिपळूण येथून ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री १० वाजता शृंगारतळी येथून दिपक पवार याला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी