शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: पावसाअभावी पिके सलाईनवर, शेतकऱ्यांचे स्वप्न करपणार

By मेहरून नाकाडे | Updated: September 2, 2023 18:37 IST

ढगाळ हवामानामुळे कीडरोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता

रत्नागिरी : पावसाने दडी मारल्याने पावसाअभावी जिल्ह्यातील पिके सध्या सलाईनवर असून पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांचे स्वप्न करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शुक्रवारी रात्री जिल्ह्यातील काही भागात पाऊस झाला असला तरी अन्यत्र मात्र शनिवारी दिवसभर ढगाळ हवामान होते. वरकस व कातळावरील भात पिके पाण्याअभावी पिवळी पडली आहेत.यावर्षी एकूणच पाऊस कमी झाला आहे. जिल्ह्याचे मुख्य पिक भात असून ६८ हजार ८८.३७ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याचे उदिद्ष्ट असताना ६१ हजार २४९.१३ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष लागवड करण्यात आली आहे. नाचणी लागवड १० हजार ३९८ .२१ हेक्टर क्षेत्रावर अपेक्षित असताना प्रत्यक्ष लागवड ९३७९.६८ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहे. तृणधान्य, तूर, मूग, उडीद व अन्य कडधान्य पिकाखालील लागवडही पावसाअभावी कमी झाली आहे. जिल्ह्यात ७९ हजार ८७१ .६५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याचे उद्दिष्ट असताना ७१ हजार ११.०९ लागवड करण्यात आली आहे. पावसाअभावी पेरण्या लांबल्या शिवाय पावसावर ८२ टक्के लागवडीची कामे पूर्ण झाली. परंतु नंतर पाऊस गायब झाल्याने प्रत्यक्ष लागवड कमी झाली आहे.गेले काही दिवस कडकडीत उन पडत असल्याने भात खाचरे कोरडी पडली आहेत. नदीकाठच्या खाचरातीलही ओलावा नष्ट झाला आहे. मात्र वरकस व कातळावरील लागवडीला चांगलाच फटका बसला आहे. पावसाअभावी उन्हामुळे जमिनीतील ओलावा नष्ट होऊन जमिनीला भेगा पडल्या आहेत. रोपे पिवळी पडली आहेत. पिकांसाठी पाऊस गरजेचा आहे. काही भागात हळवे भात प्रसवले आहे. तर काही भागात फुलोरा स्वरूपात आहे.पावसाअभावी फुलोरा वाळण्याचा धोका आहे. शिवाय ढगाळ हवामानामुळे कीडरोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे. कडकडीत उन्हामुळे काही ठिकाणी करपा रोग पडला आहे. काही ठिकाणी पाने गुंडाळणारी अळी, निळे भुंगेरे, तपकिरी तुडतुड्यांचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे.

काही तालुक्यात भात, नाचणी पिकावर करपा रोग पडला आहे. सध्या पिकांसाठी पाऊस गरजेचा आहे. पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांनी जमेल तसे पाणी देण्याची व्यवस्था करावी. पिकांचे वेळोवेळी निरीक्षण करून कीडरोग नियंत्रणासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. - सुनंदा कुऱ्हाडे, कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी, रत्नागिरी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसFarmerशेतकरी