चिपळुणातील चायनीज सेंटरवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:33 IST2021-04-09T04:33:55+5:302021-04-09T04:33:55+5:30
चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक वस्तू विक्रीस मान्यता देताना रात्री ८ नंतर दुकाने पूर्णत: बंद ठेवण्याच्या ...

चिपळुणातील चायनीज सेंटरवर गुन्हा दाखल
चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक वस्तू विक्रीस मान्यता देताना रात्री ८ नंतर दुकाने पूर्णत: बंद ठेवण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. तरीही शहरातील मार्कंडी येथील रसिक चायनीज सेंटर रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवल्याने संबंधित मालकांवर गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यात अशा पद्धतीचा पहिला गुन्हा दाखल झाला.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्यावश्यक सेवावगळता इतर सेवा, व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्यानुसार शहर व तालुक्यातील दुकानदारांना रात्री ८ नंतर दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या होत्या. तरीही अनेक दुकानदार या नियमाचे जाहीरपणे उल्लंघन करू लागले आहेत. पोलिसांनी बुधवारी रात्री गस्त घालताना मार्कंडी येथील रसिक चायनिज सेंटर सुरू होते. सेंटरच्या मालकांवर भारतीय दंड विधान कलम २६९, २७०, १८८ नुसार साथरोग प्रतिबंध कायदा अधिनियम १८९७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या सेंटरवर कारवाई होताच शहरातील अनेक व्यापारी व दुकानदारांनी त्याचा धसका घेत शटर त्वरित बंद केले.