वणंद येथे सांस्कृतिक कार्यक्रम केल्याप्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:27 IST2021-04-26T04:27:38+5:302021-04-26T04:27:38+5:30
दापोली : ‘ब्रेक द चेन’च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या आदेशाचे उल्लंघन करत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याचा प्रकार दापाेली ...

वणंद येथे सांस्कृतिक कार्यक्रम केल्याप्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
दापोली : ‘ब्रेक द चेन’च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या आदेशाचे उल्लंघन करत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याचा प्रकार दापाेली तालुक्यातील वणंद लोवरेवाडी येथील मंदिरात घडला. याप्रकरणी ७ जणांविरोधात दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवार २१ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता सुमारास घडली.
याप्रकरणी वसंत लोवरे, समीर काटकर, सुजित काटकर, सिध्देश लोवरे, राजेश लावरे, सचिन लोवरे आणि संजय लोवरे (सर्व रा. वणंद लोवरेवाडी, दापोली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात नारायण नागेश गुजर (५७, रा. वणंद गुजरवाडी, दापोली) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार, या सर्वांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करत तेथील साई मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली अधिक तपास महिला पोलीस हेड काॅन्स्टेबल सुकाळे करत आहेत.