७ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:23 IST2021-06-05T04:23:37+5:302021-06-05T04:23:37+5:30

राजापूर : नियमांचे पालन करून कोरोनाबाधित मृत व्यक्तीचा अंत्यसंस्कार करू, अशी प्रशासनाला लेखी हमी दिल्यानंतर प्रत्यक्षात मात्र संसर्ग रोखण्यासाठी ...

Crime filed against 7 persons | ७ जणांवर गुन्हा दाखल

७ जणांवर गुन्हा दाखल

राजापूर : नियमांचे पालन करून कोरोनाबाधित मृत व्यक्तीचा अंत्यसंस्कार करू, अशी प्रशासनाला लेखी हमी दिल्यानंतर प्रत्यक्षात मात्र संसर्ग रोखण्यासाठी बांधून दिलेला मृतदेह बाहेर काढून धार्मिक विधी करण्याचा प्रकार शहरातील कोंढेतड येथे उघड झाला आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

राजापूर नगर परिषदेचे वरिष्ठ लिपिक जितेंद्र जाधव यांनी शुक्रवारी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी फकीर जाफर हवालदार (५१, रा. कोंढेतड), सारंग (सारंग सायकल मार्ट, नाव कळून आले नाही), बलबले (नाव माहीत नाही) व अन्य चार जणांवर भारतीय दंड विधान कलम २६९ व साथरोग प्रतिबंध कायदा १८९७चे कलम २९३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Crime filed against 7 persons