गावठी हातभट्टीप्रकरणी दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:34 IST2021-09-26T04:34:41+5:302021-09-26T04:34:41+5:30
चिपळूण : तालुक्यातील रामपूर व पालवण या दोन वेगवेगळ्या ठिकाणी गैरकायदा गावठी हातभट्टीची दारू चोरून विकी करणाऱ्यांवर शुक्रवारी छापा ...

गावठी हातभट्टीप्रकरणी दोघांवर गुन्हा
चिपळूण : तालुक्यातील रामपूर व पालवण या दोन वेगवेगळ्या ठिकाणी गैरकायदा गावठी हातभट्टीची दारू चोरून विकी करणाऱ्यांवर शुक्रवारी छापा टाकून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दोघांकडून ८७० रुपये किमतीची गावठी दारू जप्त करण्यात आली.
अनिल वसंत आग्रे (३९, रामपूर-रावंगणवाडी) व राकेश साहेबराव राजेशिर्के (३६, पालवण, भाऊसाहेबनगर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद नामदेव विष्णू जाधव (साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, चिपळूण) व रमेश गंगाराम जड्यार (पोलीस कॉन्स्टेबल, सावर्डे) यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आग्रे हा रामपूर-बैकरवाडी एस.टी. थांब्याशेजारी, तर राजेशिर्के हा पालवण-भाऊसाहेबनगर येथे घराच्या मागील बाजूस गैरकायदा गावठी हातभट्टीची दारूविकी करीत होता. याची माहिती पोलिसांना मिळाल्याने त्यांनी त्यांच्यावर छापा टाकला. यात आग्रे याच्याकडून ३२० रुपये, तर राजेशिर्के याच्याकडून ५५० रुपये किमतीची गावठी दारू पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.