शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

चिपळूणमध्ये आल्यावर खेकड्यांची भीती वाटते - अमोल कोल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 19:13 IST

१० वर्षात जर अशी धरणं फुटायला लागली तर असे खेकडे सर्वच ठेकेदारांना हवेहवेसे वाटतील. त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत जनताच धडा शिकवून खेकडे कसे धरण फोडतात हे दाखवून देईल, असेही डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

ठळक मुद्दे चिपळुणात युतीला चिमटा

 

चिपळूण : चिपळूणमध्ये आल्यावर खेकड्यांची खूप भीती वाटते, असे सांगत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना आणि भाजपवर सडकून टिका केली. तिवरे धरण फुटले व २३ जण मृत्यूमुखी पडले, अनेक घरे उद्ध्वस्त झाली. आया-बहिणींचे कुंकू पुसले गेले, कच्ची-बच्ची अनाथ झाली आणि सत्तेत असलेले मंत्री खेकड्यांनी धरण फोडले, असे बेजबाबदार विधान करतात. १० वर्षात जर अशी धरणं फुटायला लागली तर असे खेकडे सर्वच ठेकेदारांना हवेहवेसे वाटतील. त्यांना येत्याविधानसभा निवडणुकीत जनताच धडा शिकवून खेकडे कसे धरण फोडतात हे दाखवून देईल, असेही डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राजवळील चौपाटीवरराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवस्वराज्य यात्रेद्वारे शुक्रवारीशक्तीप्रदर्शन केले. यावेळी आयोजित सभेला जनसमुदाय उपस्थित होता.गुहागरहून शिवस्वराज्य यात्रा उक्ताड येथे आल्यानंतर तिचे स्वागत करण्यातआले. तेथून दुचाकी रॅली काढण्यात आली.डॉ. कोल्हे म्हणाले की, राज्यात आणि केंद्रात असलेले सरकार शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेवर आले आहे. शिवाजी महाराजांच्या नावाचा सर्वात जास्त वापर जर कोणी केला असेल तर या सरकारने केला आहे. सत्तेत असूनसुद्धाअरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी ते काहीच करू शकले  नाहीत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेला शिवाजी महाराजांचे नाव दिले आणि फसवी कर्जमाफी केली. शिवाजी महाराजांनी उभारलेले गड, किल्ले हे भाड्यानेदेण्याचा निर्णय घेतात, ही शोकांतिका असल्याचे ते म्हणाले.कोल्हे पुढे म्हणाले की, सत्तेत समान भागीदार असलेली शिवसेना गत पाच वर्षात काहीच करू शकलेली नाही. शेतकऱ्यांसाठी शिवराय हे शेवटपर्यंत लढले; पण सेना-भाजपच्या राज्यात १६ हजार शेतकरी आत्महत्या करतात हा महाराजांचा अपमान नव्हे काय? असा सवाल करत खासदार डॉ. कोल्हे यांनी शिवसेना व भाजपवर जोरदार टीका केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNCPराष्ट्रवादी काँग्रेस