सती-चिंचघरी येथे २५ ऑक्सिजन बेड्सचे कोविड केअर सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:32 IST2021-04-20T04:32:37+5:302021-04-20T04:32:37+5:30
चिपळूण : आ. शेखर निकम यांच्या पुढाकाराने सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल सती-चिंचघरी येथे २५ ऑक्सिजन बेड्सचे कोविड ...

सती-चिंचघरी येथे २५ ऑक्सिजन बेड्सचे कोविड केअर सेंटर
चिपळूण : आ. शेखर निकम यांच्या पुढाकाराने सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल सती-चिंचघरी येथे २५ ऑक्सिजन बेड्सचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे.
चिपळूण तालुक्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि अपुरे पडणारी बेड्सची कमतरता हे सगळे पाहता आ. निकम यांच्या पुढाकाराने आणि आयुसिद्धी हॉस्पिटलचे डॉ. राकेश चाळके,डॉ. जलश्री चाळके यांच्या व्यवस्थापनेखाली कोविड केअर सेंटर सह्याद्री शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल खेर्डी-सती चिंचखरी येथे सुरू करण्यात आले आहे.
यावेळी आ. निकम, चिपळूणचे तहसीलदार जयराज सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव, कामथे उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. अजय सानप, चिपळूण राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, रत्नागिरी राष्ट्रवादी युवक ज़िल्हाध्यक्ष योगेश शिर्के, जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोलकर, चिपळूण पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, बाबू साळवी, खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोलकर, शशिकांत चाळके, राजाभाऊ चाळके, रमेश चाळके,सदानंद चाळके, पंढरीनाथ चाळके, कृष्णा चाळके, रघुनाथ खेतले, उदय भोजने, राजेंद्र वारे, अरविंद सकपाळ यांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडले.