दाम्पत्याने एकाच दिवशी घेतला जगाचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:33 IST2021-05-19T04:33:06+5:302021-05-19T04:33:06+5:30

चिपळूण : तालुक्यातील चिंचघरी - हनुमानवाडी येथील रहिवासी, माजी सैनिक पर्बत चाळके (६१) व त्यांच्या पत्नी प्रभावती चाळके (५८) ...

The couple said goodbye to the world on the same day | दाम्पत्याने एकाच दिवशी घेतला जगाचा निरोप

दाम्पत्याने एकाच दिवशी घेतला जगाचा निरोप

चिपळूण : तालुक्यातील चिंचघरी - हनुमानवाडी येथील रहिवासी, माजी सैनिक पर्बत चाळके (६१) व त्यांच्या पत्नी प्रभावती चाळके (५८) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झाले. एकाच दिवशी ज्येष्ठ दाम्पत्याने जगाचा निरोप घेतल्याने चाळके कुटुंबासह चिंचघरी गावावरही शोककळा पसरली आहे.

पर्बत चाळके हे सैन्यात होते. निवृत्तीनंतर त्यांनी मुंबई येथे बँकेत सेवा बजावली. गतवर्षी ३१ मे राेजी ते निवृत्त होऊन आपल्या मूळ गावी म्हणजेच चिंचघरी - हनुमानवाडी येथे आले. मुंबईत असताना त्यांचे सुट्टीच्या काळात अथवा भावकीच्या बैठकीला गावी येणे-जाणे असायचे. त्यांना त्यांच्या वैवाहिक आयुष्यात समर्थ साथ लाभली ती त्यांच्या पत्नी प्रभावती चाळके यांची. गावाच्या विकासात या दाम्पत्याने मोठे योगदान दिले.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर चिपळूण येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू होते. शनिवारचा दिवस या दाम्पत्यासाठी घातक ठरला. काळाने या दोघांवरही झडप घातली आणि चाळके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला़ त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन मुलगे, दोन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: The couple said goodbye to the world on the same day