शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

घनकचऱ्याचा ‘सैराट’ कारभार!

By admin | Updated: May 14, 2016 00:04 IST

प्रकल्पाचे तीनतेरा : निधी मिळूनही १५ वर्षे जागेचा शोध सुरूच...

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरीरत्नागिरी शहराच्या पाणीप्रश्नाइतकाच शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात दररोज २२ ते २४ टन कचरा संकलित होत असताना वर्षोनुवर्षे कचऱ्याचे ढीग जमा झाले तरी कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प गेल्या पंधरा वर्षात पालिकेतील कारभाऱ्यांना उभारता आला नाही. प्रकल्प उभारणीबाबतचा हा कारभार ‘सैराट’ नव्हे तर दुसरे काय, अशा तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत. रत्नागिरी हे जिल्ह्याची राजधानी असलेले शहर आहे. लोकसंख्याही प्रत्यक्षात ७७ हजार आहे. शहराचा विस्तार होत आहे. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. दररोज २२ ते २४ टन कचरा जमा होत आहे. कचरा संकलनाची पालिकेची व्यवस्था काही त्रुटी सोडल्या तर चांगली आहे. कचरा संकलनासाठी घंटा गाड्या आहेत. दहापेक्षा अधिक कचरावाहक वाहने पालिकेकडे आहेत. सफाई कामगारांची संख्या मोठी आहे. पालिकेचे व कंत्राटी असे सफाई कामगार शहर सफाई कामात व्यस्त असतात. परंतु, जमा होणाऱ्या कचऱ्याचे काय करायचे असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पंधरा वर्षांपूर्वी शहराच्या मिऱ्या हद्दीवजळ कचरा टाकला जात होता. तेथे कचऱ्याचे ढीग जमा झाल्यानंतर कचरा कुजून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. नागरिकांचा तेथे कचरा टाकण्यास विरोध झाल्याने साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारातील मोठ्या जागेत शहरातील संकलित कचरा टाकणे सुरू झाले. एवढी मोठी जागा असूनही तेथे पंधरा वर्षात कचऱ्याचे मैदानच तयार झाले. जाळून कचरा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. परंतु, कचरा काही संपला नाही. मात्र, धुराच्या लोटांमुळे साळवी स्टॉप येथील नागरिकांचा येथे कचरा टाकण्यास तीव्र विरोध सुरू झाला. त्यामुळे चार महिन्यांपूर्वीच साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात कचरा टाकणे पालिकेला बंद करावे लागले. आता हा कचरा कोकणनगरमधील खोदाई झालेल्या चिरेखाणीत टाकला जात आहे. त्यालाही सुरुवातीला काही प्रमाणात विरोध झाला. परंतु, सध्या तेथे दररोज जमा होणारा २२ टन अर्थात दर महिन्याला ६६० टन तर वर्षाला ७,९२० टन या हिशेबाने कचरा संकलित होणार आहे. दरवर्षी सुमारे ८ हजार टन जमा होणारा कचरा मात्र नष्ट करण्याची वा त्याच्यावर प्रक्रिया करण्याची कोणतीही व्यवस्था पालिकेला गेल्या पंधरा वर्षात करता आलेली नाही. शासनाने प्रत्येक पालिकेला घनकचरा प्रकल्प उभारण्याचे निर्देश दिले आहेत. त्याची मुदतही वारंवार वाढविण्यात आली. तरीही जागा मिळू शकलेली नाही. दांडेआडोम येथे अनेक वर्षांपूर्वी घनकचरा प्रकल्पासाठी घेतलेली जमीन पालिकेकडे आहे. परंतु, तेथे जाण्यास प्रथम त्या गावच्या लोकांनी रस्त्याला जागा नाकारली. नंतर हे प्रकरण न्यायालयात गेले आणि ग्रामस्थांच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे दांडेआडोम येथे घनकचरा प्रकल्प होण्याची आशा मावळली आहे. गेल्या पंधरा वर्षात घनकचरा प्रकल्पाला जागा मिळत नाही आणि कारभारी वेगवेगळया जागा दाखवत वेळ मारून नेत आहेत.प्रकल्पाला खो : कारभारी, लोकप्रतिनिधीच जबाबदार...सर्वांसाठी लढणारा शूरवीर सर्वांना हवा आहे. मात्र, तो आपल्या घरात नको, अशी सर्वांचीच भूमिका असते. घनकचरा प्रकल्पाबाबतही असाच काहीसा प्रकार घडला आहे. शहरातील सर्वच नागरिकांकडे कचरा या ना त्या कारणाने जमा होतो. परंतु, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी, कचऱ्यावर प्रक्रीया करण्यासाठी आपल्या भागात घनकचरा प्रकल्प नको, अशी भूमिका सातत्याने घेतली गेली आहे. ही भूमिका नागरिकांपेक्षाही त्या-त्या वॉर्डमधील लोकप्रतिनिधींनी घेतली आहे. त्यामुळेच घनकचरा प्रकल्पाला खो बसला आहे. विरोध झुगारून चांगला प्रकल्प राबविण्यासाठी लोकप्रतिनिधीच सहकार्य करत नाहीत. त्यांचे लक्ष मतांच्या गोळाबेरजेवर असल्यानेच ही स्थिती आहे. प्रकल्पाबाबत रोज नवे...शहरातील कचरा प्रक्रिया प्रकल्प गेल्या पंधरा वर्षात होऊ न शकल्याने कचरा समस्या गंभीर बनली आहे. याबाबत कारभारी सातत्याने ‘आज इथे तर उद्या तिथे’ असा प्रकल्प होणार असल्याची आश्वासने देत आहेत. प्रत्यक्षात घनकचरा प्रकल्पाचा पत्ताच नाही.