‘लाखमोला’चा खर्च
By Admin | Updated: October 17, 2014 22:15 IST2014-10-17T21:52:51+5:302014-10-17T22:15:17+5:30
विधानसभा निवडणूक : राजेंद्र देसार्इंचा प्रथम क्रमांक

‘लाखमोला’चा खर्च
रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी लढविणाऱ्या पाच मतदार संघातील उमेदवारांनी १२ आॅक्टोबर-अखेरपर्यंतचा आपला निवडणुकीचा खर्च नुकताच प्रशासनाकडे सादर केला आहे. पाचही मतदार संघात आतापर्यंत केलेल्या खर्चात राजापूर मतदार संघातील उमेदवार राजेंद्र देसाई हे आताही प्रथम क्रमांकावर असून, त्याखालोखाल दापोली मतदार संघातील सूर्यकांत दळवी आणि राजापूर मतदार संघातील संजय यादव यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक कायम राखला आहे.
निवडणुकीच्या प्रचारासाठी निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारासाठी २८ लाख रूपये खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी खर्च संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडे सर्व उमेदवारांना दररोज प्रचार सभा तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने होणारा खर्च सादर करावा लागतो. पाच मतदार संघातील ४१ उमेदवारांनी २७ सप्टेंबर ते १२ आॅक्टोबर या कालावधीत विधानसभा निवडणूक प्रचारासाठी केलेला खर्च नुकताच जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही मतदार संघात आतापर्यंत केलेल्या खर्चात राजापूर मतदार संघातील उमेदवार राजेंद्र देसाई यांचा सर्वाधिक खर्च (१३,५९,२३२ रूपये) इतका झाला असून, त्याखालोखाल दापोली मतदार संघातील सूर्यकांत दळवी (११,५५,८५१ रूपये) आणि तृतीय क्रमांकावर राजापूर मतदार संघातील संजय यादवराव (८,११,९०९ रूपये) यांचा खर्च झाला आहे.
दापोलीत सूर्यकांत दळवी, गुहागरात भास्कर जाधव, चिपळुणात यावेळी रश्मी कदम, रत्नागिरीत उदय सामंत आणि राजापुरात राजेंद्र देसाई आघाडीवर आहेत. यापैकी २५ उमेदवारांचे खर्च लाखापेक्षा जास्त असून, उर्वरितांचे त्याच्या आत
आहेत.
यापैकी दापोलीतील आठ, गुहागरातील पाच, चिपळुणातील चार, रत्नागिरीतील चार आणि राजापुरातील चार अशा १८ उमेदवारांचा खर्च एक लाखापेक्षा अधिक आहे, तर उर्वरित उमेदवारांचा खर्च हजारात आहे.
आता शेवटच्या टप्प्यातील खर्च या सर्व उमेदवारांना मतमोजणीनंतर ३० दिवसांच्या आत जिल्हा प्रशासनाकडे सादर करावा लागणार आहे. त्यामुळे १९ नोव्हेंबरपर्यंत हा खर्च सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
मतदारउमेदवाराचे खर्च
संघनाव
संजय कदम६,७३,६९५
केदार साठे२,९५,३८२
वैभव खेडेकर३,८५,११५
सुजित झिमण२,२०,४४५
ज्ञानदेव खांब१,४१,५९५
सूर्यकांत दळवी१,५५,८५१
भास्कर जाधव७,५६,११६
डॉ. विनय नातू६,१५,२२५
संदीप सावंत१,५२,५८५
सुरेश गमरे १,७१,३४४
विजयकुमार भोसले६,७४,५११
किशोर देसाई१,७९,९४५
सदानंद चव्हाण४,६९,३४६
शेखर निकम५,६५,६०४
रश्मी कदम६,९३,९१७
माधव गवळी६,७२,८५८
उदय सामंत६,३०,५११
सुरेंद्र माने ६,११,०९०
बशीर मुर्तुझा३,०६,६९९
रमेश कीर १,१५,८४४
संजय यादवराव८,११,९०९
राजेंद्र देसाई१३,५९,२३२
राजन साळवी५,३६,८६७
अजित यशवंतराव३,१३,२३३