शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus रत्नागिरी जिल्ह्यात आणखी दोन कोरोनाबाधित सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 22:01 IST

मंडणगड, संगमेश्वर तालुक्यात कोरोनाबाधित रूग्ण आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी :   जिल्हा कोरोनामुक्त झाल्यानंतर आठवडाभराच्या कालावधीतच शनिवारी दोन मुंबईकर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यानंतर रविवारी आणखी दोघांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. मंडणगड तालुक्यातील तिडे आणि संगमेश्वर तालुक्यातील पूर येथे मुंबईतून आलेले दोघेजण कोरोनाबाधित आढळले. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता १० वर पोहोचली असून, जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली आहे. मंडणगडमधील तिडे आणि संगमेश्वरातील पूर गाव तत्काळ सील करण्यात आली आहेत. या दोघांनाही उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात आणण्यात येणार आहे.

जिल्ह्यात केवळ ६ कोरोनाबाधित सापडले होते. त्यापैकी ५ जण बरे झाले असून, एकाचा मृत्यू झाला होता़ कोरोनाबाधित सहावा रुग्ण सापडल्यानंतर सुमारे १५ दिवसांच्या कालावधीत एकही नवा रुग्ण जिल्ह्यात सापडला नव्हता़ मात्र, शनिवारी चिपळूण तालुक्यातील खांदाटपाली आणि संगमेश्वरातील बामणोली येथील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

जिल्हा शासकीय रुग्णालयाने जिल्हाभरातून स्वॅबचे नमुने तपासणीसाठी मिरज येथे पाठविले होते़ त्यातील ८५ नमुन्यांचा अहवाल रविवारी सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयाला प्राप्त झाला़ ते सर्वच अहवाल निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हावासियांना दिलासा मिळाला होता. मात्र, रविवारी रात्री मंडणगड आणि संगमेश्वर तालुक्यातील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे कळताच प्रशासनाची झोप उडाली आहे. मंडणगड तालुक्यातील तिडे येथील व्यक्ती २९ एप्रिल रोजी मुंबईतून आडवाटेने चालत गावी आली होती. त्यानंतर ग्रामस्थांनी माहिती देताच त्याला क्वॉरंटाईन करण्यात आले होते. या ग्रामस्थासह अन्य २० जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हे अहवाल रविवारी रात्री प्राप्त झाल्यानंतर मुंबईतून आलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले.

त्याचबरोबर संगमेश्वर तालुक्यातील पूर येथील एका महिलेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही महिला शनिवारी मुंबईतून पास घेऊन खासगी वाहनाने पूर - झेपलेवाडी येथे आली होती. ती मुंबईतून आल्यानंतर तिचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी रात्री प्राप्त झाला असून, तो पॉझिटिव्ह आहे. या महिलेला तत्काळ क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRatnagiriरत्नागिरी