चिपळूण : येथील बाजारपेठेत मंगळवारी खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. या गर्दीमुळे काही दुकानांमधून सोशल डिस्टन्सिंग न राखताच खरेदी सुरू होती. तर बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. तालुक्यात आतापर्यंत १९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनही गंभीर झाले आहे. मात्र, कोरोनाची भीती दूर सारून चिपळूण बाजारपेठ गर्दीने फुलून गेली होती.तालुक्यात कोरोना रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. आतापर्यंत तालुक्यात ६,१६२ रुग्ण सापडले असून ४,६२७ रुग्ण बरे झाले तर १३४१ रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या दोन दिवसांत रुग्ण संख्या कमी झाली असली तरी मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यातच आता बाजारपेठेतील भाजी बाजार रविवारपासून सुरु झाले आहे. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. मंगळवारी सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती. भाजी मंडई, पानगल्ली परिसरात ही झाली होती.मेडिकलची दुकाने वगळता अन्य जीवनावश्यक वस्तूंची विक्री सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच सुरु ठेवायची आहेत. तरीही काही ठिकाणी हाफ शटर दुकाने उघडून व्यापार केला जात आहे. याविषयी गंभीरपणे दखल घेत पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी मंगळवारी काही व्यापाऱ्यांना समज दिली. तसेच दुकाने उघडी ठेवल्यास थेट गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा दिला. यानंतर काहींना एक हजार रुपयांचा दंड बजावला.
CoronaVIrus In Ratnagiri: चिपळूण बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 16:45 IST
CoronaVirus Ratnagiri : चिपळूण येथील बाजारपेठेत मंगळवारी खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. या गर्दीमुळे काही दुकानांमधून सोशल डिस्टन्सिंग न राखताच खरेदी सुरू होती. तर बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. तालुक्यात आतापर्यंत १९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनही गंभीर झाले आहे. मात्र, कोरोनाची भीती दूर सारून चिपळूण बाजारपेठ गर्दीने फुलून गेली होती.
CoronaVIrus In Ratnagiri: चिपळूण बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी
ठळक मुद्देचिपळूण बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दीबाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी