शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

CoronaVirus Lockdown : संभ्रमावस्थेत परप्रांतीय, जीवाच्या भीतीने परतायचे की पोटाच्या आगीसाठी थांबायचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 18:40 IST

दीड महिना घरात बसून राहिलेल्या मजूर, कामगारवर्गाचा संयम आता सुटू लागला असल्याने आपल्या मूळ गावी जाण्यासाठी ते अधीर झाले आहेत. मात्र त्याचवेळी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन १७ मे रोजी संपल्यानंतर काही कामे तसेच उद्योग सुरू होतील, अशी आशा वाटत असल्याने आता गावाला जावं की थांबावं, अशा संभ्रमावस्थेत काही परप्रांतीय मजूर, कामगार सापडले आहेत.

ठळक मुद्देजीवाच्या भीतीने परतायचे की पोटाच्या आगीसाठी थांबायचेसंभ्रमावस्थेत परप्रांतीय मजूर, कामगार

रत्नागिरी :    दीड महिना घरात बसून राहिलेल्या मजूर, कामगारवर्गाचा संयम आता सुटू लागला असल्याने आपल्या मूळ गावी जाण्यासाठी ते अधीर झाले आहेत. मात्र त्याचवेळी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन १७ मे रोजी संपल्यानंतर काही कामे तसेच उद्योग सुरू होतील, अशी आशा वाटत असल्याने आता गावाला जावं की थांबावं, अशा संभ्रमावस्थेत काही परप्रांतीय मजूर, कामगार सापडले आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव थोपवण्याच्या दृष्टीने २३ मार्चपासून देशभर लॉकडाऊन सुरू झाले आहे. सुरूवातीला हे लॉकडाऊन ३१ मार्चपर्यंत जाहीर करण्यात आले होते. मात्र, कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता लॉकडाऊनची मुदत दुसऱ्या टप्प्यात पुन्हा १४ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली.

या कालावधीत सर्वच छोटे मोठे व्यवसाय - उद्योग आणि बांधकाम, रस्ते आदी कामे थांबल्याने या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना घरी बसण्याची वेळ आली आहे. ज्यांचे हातावर पोट आहे, अशा मजुरांचीही काम नसल्याने आता मोठ्या प्रमाणावर उपासमार होत आहे.परजिल्ह्यातील, परराज्यातील मजुरांना याचा फटका जास्त बसला. कुटुंब सोबत असल्याने बहुतांश मजूर भाड्याच्या खोलीत राहात आहेत. त्यामुळे काम बंद असले तरी खोलीचे भाडे आणि दर दिवसाचा खाण्या-पिण्याचा खर्च तर करावाच लागत आहे. त्यामुळे काहींची उपासमार होत आहे.

जिल्ह्यात सुमारे १५ ते २० हजार कामगार, मजूर वास्तव्याला आहेत. जिल्हा प्रशासनाकडून तसेच सामाजिक संस्थांकडून त्यांना काहीअंशी मदतीचा हात दिला जात असला तरी इतर जीवनावश्यक वस्तू त्यांना मिळेनाशा झाल्या आहेत. मुलाबाळांचे हाल होऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या मूळ गावाचे वेध लागले आहेत.१४ एप्रिलपर्यंत असलेला लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढल्यानंतर मात्र या कामगारांचा संयम सुटू लागला. काही जण आपल्या मूळ गावी पायी जाऊ लागले. त्यातच राज्य सरकारने या कामगारांना त्यांच्या गावात जाण्यासाठी व्यवस्था करण्याचे संकेत दिल्याने या कामगारांच्या आशा पालवल्या आहेत.

३ मेनंतर काही प्रमाणात शिथिलता आली आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने इतर जिल्ह्यात तसेच राज्यातील मजुरांना पाठविण्याची व्यवस्था केल्याने अनेक कामगार परतले आहेत. परंतु काही ठिकाणी बांधकामे सुरू झाली असून, १७ मेनंतर इतरही उद्योग सुरू होतील, अशी आशा काही कामगारांना वाटत आहे. त्यामुळे गावाला जावे की इथच राहावे, अशा द्विधा अवस्थेत अडकले आहेत. काहींनी तर गावाला जाण्याचा विचार बदलला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी