शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Coronavirus : ‘कोकणचा राजा’ हापूस आंब्यालाही कोरोनाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 12:59 AM

Coronavirus: गतवर्षी पाऊस लांबला. उशिरापर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच क्यार आणि माहा या दोन मोठ्या वादळांमुळे ऋतूचक्रात मोठे बदल झाले.

- मनोज मुळ््येरत्नागिरी : उशिरापर्यंत सुरू असलेली अतिवृष्टी, दोन मोठी वादळे यामुळे आधीच तोट्यात गेलेल्या हापूस आंब्याच्या उरल्या सुरल्या उत्पादनाला कोरोनाचा फटका बसला आहे. कोरोनामुळे आंबा निर्यातीला पूर्ण मर्यादा आल्या असून, कोकणच्या राजावर आता अश्रू ढाळण्याची वेळ आली आहे.गतवर्षी पाऊस लांबला. उशिरापर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच क्यार आणि माहा या दोन मोठ्या वादळांमुळे ऋतूचक्रात मोठे बदल झाले. त्याचा मोठा फटका किनारपट्टी भागाला अधिक बसला. या बदलामुळे थंडीचे आगमन उशिराने झाले. त्यामुळे डिसेंबरअखेरपर्यंत आंब्याला मोहोरच आला नाही. जानेवारी महिन्यात थंडी सुरू झाल्यानंतर मोहोर आला. मात्र या विलंबामुळे सरासरी उत्पादनाच्या ४0 टक्के इतकाच मोहोर आला. हा आंबा उशिराने हाती येणार हे निश्चित आहे. मे महिन्यात हापूससोबतच कर्नाटक, गुजरातचा आंबा बाजारात येतो. त्यामुळे उशिराने आलेले आंबा पीक बागायतदारांना फायदेशीर ठरत नाही.एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी सरासरी १ लाख टनापेक्षा अधिक आंबा उत्पादित होतो. त्यातून दरवर्षी ४00 ते ५00 कोटी रूपयांची उलाढाल होते. मात्र यंदा मुळातच या सरासरी उत्पादनात ६0 टक्क्यांची घट झाली आहे. जे काही उत्पादन हाती येणार आहे, ते परदेशी पाठवण्याची तयारी करण्यात आली होती. आॅनलाईन सुविधेमार्फत, पणन मंडळाकडून त्याबाबत मोठ्या हालचाली झाल्या होत्या. मात्र आता या साऱ्या प्रयत्नांवर कोरोनामुळे पाणी फेरले आहे. कोरोनामुळे बहुतांश देशांची विमानसेवा बंद झाली आहे. त्यामुळे निर्यातीचा मोठा प्रश्न आहे. एप्रिलच्या मध्यापासून आंबा पीक हाती येण्यास सुरूवात होईल. मे महिन्यात त्याची आवक अधिक असेल. अशावेळी इतर राज्यातील आंब्याशी स्पर्धा करून कोकणाच्या राजाला बाजारात टिकाव धरणे अवघड होणार आहे. तोपर्यंत विमानसेवा सुरळीत झाली तरी इतर देशांमधून हापूसला मागणी येईल का, हा प्रश्न असेल.आखाती देशात समुद्रमार्गे त्यातल्या त्यात थोडा दिलासा आखाती देशांमधील हापूस निर्यातीला मिळाला आहे. विमानसेवा बंद असल्याने१0 हजार पेट्या आंबा समुद्रमार्गे आखाती देशांमध्ये पाठवण्यात आला आहे. ही सुविधा विमानसेवेपेक्षा खूपच स्वस्त असलीतरी त्यात जाणारा वेळ लक्षात घेता ती कायमस्वरूपी उपयोगी पडणारी नाही. यंदा निर्यात पूर्ण बंद होण्यापेक्षा एवढा तरी दिलासा मिळाला आहे.निर्यातीची नवी दारे उघडून बंदआॅनलाईन पद्धतीने युरोपीय देशांसोबतच यंदा दक्षिण कोरिया आणि अर्जेंटीना या दोन देशांकडून नव्याने हापूसला मागणी आली होती. त्यामुळे यंदा निर्यातीची नवी दारे उघडणार, हे बागायतादारांसाठी सुखावह होते. मात्र आता विमानसेवाच अडचणीत आल्यामुळे या देशांमध्ये होऊ शकणारी आंबा निर्यात धोक्यात आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस