शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: रत्नागिरी जिल्ह्यात ९ नवे कोरोनाचे रुग्ण, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४३ वर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 21:53 IST

जिल्ह्यात आठवडाभराच्या कालावधीत ३७ कोरोनाबाधित रुग्ण वाढले असून, त्यातील ३६ जण मुंबईकर आहेत.

ठळक मुद्दे रविवारी सायंकाळी जिल्ह्यातील ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांचा आकडा ४३ वर पोहोचला आहे. कोरोनाबाधित रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे.  रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरीतील ४ तर संगमेश्वरातील ४ जणांचा समावेश आहे.

रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शनिवारी रात्री उशिराने दापोलीतील तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तर रविवारी सायंकाळी जिल्ह्यातील ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांचा आकडा ४३ वर पोहोचला आहे. रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरीतील ४ तर संगमेश्वरातील ४ जणांचा समावेश आहे. रत्नागिरीत आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये एका नर्सिंगच्या विद्यार्थिनीचाही समावेश आहे. 

जिल्ह्यात आठवडाभराच्या कालावधीत ३७ कोरोनाबाधित रुग्ण वाढले असून, त्यातील ३६ जण मुंबईकर आहेत़  शनिवारी मंडणगड तालुक्यातील ११ आणि  खेडमधील २  असे एकूण १३ रुग्ण सापडले होते. त्यानंतर रात्री उशिरा दापोली तालुक्यातील दर्दे येथील ३५ वर्षीय तरुण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले़ हा तरुण मुंबईतील जोगेश्वरी येथून ७ मे रोजी दापोलीत गावी जाण्यासाठी आला होता़  त्याला प्रशासनाने दापोली येथील डॉ़ बाळासाहे सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या किसान भवनात विलगीकरण केंद्रात क्वारंटाईन केले होते़रविवारी सायंकाळी रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यात प्रत्येकी ४ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. 

रत्नागिरीत आढळलेल्या रुग्णांमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नर्सिंग विद्यार्थिनीचा समावेश आहे. कोरोनाबाधित होणारी ती दुसरी नर्सिंगची विद्यार्थिनी आहे. तर १ कर्ला, १ सोमेश्वरमधील आहेत. मात्र, एकजण नेमका कुठला आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. रत्नागिरीत आढळलेल्या नवीन ४ रुग्णांमुळे तालुक्यातील रुग्णांची संख्या एकूण ९ झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. 

संगमेश्वर तालुक्यात आढळलेल्या चार रुग्णांमध्ये कळंबुशीतील एकजण असून, तो ५ मे रोजी मुंबईवरुन गावी आला होता. पीर धामापूरमधील दोघे ६ मे रोजी तर फुणगूसमधील एकजण ७ मे रोजी गावी आला होता. या सर्वांना साडवली येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. विलगीकरण कक्षातील रुग्णांना कोरोनाची बाधा होताच रविवारी सायंकाळी संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोरोनाबाधित चौघांना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRatnagiriरत्नागिरीMaharashtraमहाराष्ट्र