शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरात पेंडखळे बनतेय कोरोनाचा हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST

राजापूर : तालुक्‍यातील पेंडखळे गाव हॉटस्पॉट बनताना याठिकाणी गेल्या दोन दिवसांत अँटिजन टेस्टमध्ये तब्बल २२ रुग्ण निष्पन्न झाले आहेत. ...

राजापूर : तालुक्‍यातील पेंडखळे गाव हॉटस्पॉट बनताना याठिकाणी गेल्या दोन दिवसांत अँटिजन टेस्टमध्ये तब्बल २२ रुग्ण निष्पन्न झाले आहेत. गेल्या चार दिवसांत तालुक्‍यात कोरोनाने कहर केल्याचे स्पष्ट झालेले असताना एकूण रुग्णांची संख्या तब्बल ७६५ वर पोहोचली आहे. यापैकी कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या ४६५ आहे. मृत्यूच्या संख्येतही पाचने वाढ होत आता ही संख्या ३० झाली आहे. मृतांमध्ये चार रुग्ण करक, तर एका पेंडखळेतील रुग्णाचा समावेश आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामासाठी आलेल्या ३४० कामगारांची बुधवारी अँटिजन तपासणी करण्यात आली. यामध्येही ३८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने त्यांना होम आयसोलेट करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत राजापूर शहरासह तालुक्‍यात कोरोनाने कहर केला आहे. दोन दिवसांतच तब्बल ९६ रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यामध्ये पेंडखळे येथीलच २२ रुग्णांचा समावेश आहे. पेंडखळे हॉटस्पॉट बनल्याने त्याठिकाणी प्रतिदिन वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक भेट देत असून, स्थितीवर लक्ष ठेवून आहे. राजापूर शहरातील ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी २८ जणांची अँटिजन तपासणी करण्यात आली. यामध्ये आठ पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत.

गेल्या काही दिवसांत तालुक्यातील कोरोना मृतांचा आकडा २५ एवढा होता. मात्र, तीन ते चार दिवसांत पाच नवे मृत्यू झाल्याने हा आकडा आता २५ झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सेफ झोन म्हणून गणला गेलेला राजापूर तालुका दुसऱ्या लाटेत मात्र कोरोनाग्रस्त झालेला दिसत आहे. तालुक्‍याच्या चोहोबाजूने रुग्ण निष्पन्न होत असल्याने आरोग्य विभागदेखील सतर्क झाला आहे.

......................................

निखिल परांजपे नवे तालुका वैद्यकीय अधिकारी

राजापूर तालुक्यातील धारतळे आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल परांजपे यांच्याकडे सध्या तालुका आरोग्य अधिकारी म्हणून तात्पुरता पदभार सोपवण्यात आला आहे. डॉ. परांजपे हे कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी म्हणून गणले जातात. त्यांच्या नियुक्‍तीने कोरोना प्रादुर्भावाच्या कठीण काळात आरोग्य विभागाच्या कारभाराला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्‍त करण्यात आली आहे.