शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : बंद पडलेली उत्पन्नाची चाके भाजीने सावरली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 18:25 IST

लॉकडाऊन कालावधीत दळणवळणाची सर्व साधने ठप्प झाली. रिक्षा व्यवसायही सुरु नसल्याने संसाराचा गाडा पुढे कसा हाकायचा या विवंचनेत सापडलेल्या कुर्णे येथील रिक्षा व्यावसायिक राजाराम सीताराम गुरव यांनी गावातील प्रत्येक वाडीत जाऊन भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवला आणि उत्पन्नाचा नवा मार्ग शोधला.

ठळक मुद्देबंद पडलेली उत्पन्नाची चाके भाजीने सावरली! भाजी व्यवसाय ना नफा ना तोटा तत्त्वावर सुरू

अनिल कासारे लांजा : लॉकडाऊन कालावधीत दळणवळणाची सर्व साधने ठप्प झाली. रिक्षा व्यवसायही सुरु नसल्याने संसाराचा गाडा पुढे कसा हाकायचा या विवंचनेत सापडलेल्या कुर्णे येथील रिक्षा व्यावसायिक राजाराम सीताराम गुरव यांनी गावातील प्रत्येक वाडीत जाऊन भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवला आणि उत्पन्नाचा नवा मार्ग शोधला.लॉकडाऊन काळात पास असल्याशिवाय घराबाहेर पडण्यास मज्जाव केला गेला. यामुळे रिक्षा व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. रिक्षा व्यवसाय हा हातावर पोट असलेला व्यवसाय आहे. भाडे मिळाले तर पैसा, नाहीतर दिवसभर रिक्षा थांब्यावर ग्राहकाची वाट बघत बसावे लागते.

राजाराम गुरव यांची स्थितीही वेगळी नव्हती. पंधरा दिवस कसेबसे गेले. त्यानंतर मात्र पैशांची चणचण भासू लागली. काहीतरी करायला हवे, हे लक्षात येत होते. पण करायचे काय, हे समजत नव्हते. पण गुरव यांनी हार मानली नाही.शेतीच्या कामासाठी त्यांनी शासकीय पास काढला आणि भाजी विक्रीचा व्यवसाय करायचा, असा मनाशी निश्चय केला. लांजा शहरात रिक्षा व्यवसाय करत असल्याने ओळख होतीच. याचा फायदा घेत गावातील लोकांनाच भाजीपाल्याची सुविधा द्यायची तयारी केली.सर्व प्रकारचे दळणवळण बंद असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत होते. त्यांना भाजीपाल्याची सेवा घरपोच दिली तर त्यांची गैरसोय दूर होईल. त्यासाठी शेतीचा वाहतूक पास होताच. त्यामुळे राजाराम गुरव यांनी आपल्या रिक्षामध्ये भाजीपाला भरून वाडीमध्ये जाऊन विक्रीचा व्यवसाय सुरु केला. त्यांना गावातील लोकांनीही चागला प्रतिसाद दिला.तालुक्यात अजूनही म्हणावी तशी एस. टी. सेवा सुरळीत झालेली नाही. त्यामुळे गावातील लोकांच्या सोयीसाठी राजाराम गुरव यांनी हा भाजी व्यवसाय ना नफा ना तोटा या तत्त्वावर सुरू केला आहे. सर्वसामान्य लोकांना लांजा येथे जाऊन भाजीपाला घेणे परवडणारे नाही. तीच भाजी वाजवी दरात उपलब्ध करून देण्याचे काम गेले साडेचार महिने ते करीत आहेत.आठवड्याचे दोन ते तीन दिवस गावातील वाड्यांमध्ये जाऊन भाजी विक्री व इतर दिवशी रिक्षा व्यावसाय करतात. एस. टी.सह दळणवळणाची इतर साधने सुरू होत नाहीत तोपर्यंत हा व्यवसाय सुरू ठेवण्याचा त्यांचा मनोदय आहे. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकvegetableभाज्याRatnagiriरत्नागिरी