शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : महाकालीच्या पालखीला भोई केवळ वीसच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 13:05 IST

Navratri, ratnagirinews, mahankali प्रति कोल्हापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आडिवरे (ता. राजापूर) येथील श्रीदेवी महाकालीच्या नवरात्रोत्सवावरही कोरोनामुळे यावर्षी बंधने आली आहेत. नवरात्रोत्सव काळात मंदिरांतर्गतच सर्व धार्मिक कार्यक्रम होणार असून, मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. निर्बंधामुळे यावर्षी पालखीसोबत केवळ २० भोई, २ अब्दागिर आणि २ ढोल ठेवण्याचा निर्णय देवस्थानने घेतला आहे.

ठळक मुद्देमहाकालीच्या पालखीला भोई केवळ वीसचनवरात्रोत्सवावर कोरोनामुळे यावर्षी बंधने

अरुण आडिवरेकर रत्नागिरी : प्रति कोल्हापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आडिवरे (ता. राजापूर) येथील श्रीदेवी महाकालीच्या नवरात्रोत्सवावरही कोरोनामुळे यावर्षी बंधने आली आहेत. नवरात्रोत्सव काळात मंदिरांतर्गतच सर्व धार्मिक कार्यक्रम होणार असून, मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. निर्बंधामुळे यावर्षी पालखीसोबत केवळ २० भोई, २ अब्दागिर आणि २ ढोल ठेवण्याचा निर्णय देवस्थानने घेतला आहे.महाराष्ट्रातील पुरातन मंदिरांपैकी एक आणि नवसाला पावणारी देवी म्हणून आडिवरे येथील श्रीदेवीची महती आहे. मंदिरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. मंदिराभोवती विविध प्रकारची दुकाने थाटण्यात येत असल्याने जत्रेचे स्वरूप आलेले असते. स्थानिकांबरोबरच घाटमाथ्यावरून व्यापारी याठिकाणी दुकाने थाटतात. नऊ दिवस मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रिघ लागलेली असते. दूरवरून भाविक मंदिरात देवीचे दर्शन घेण्याबरोबरच ओटी भरण्यासाठी येतात.कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. शासनाच्या या निर्णयाचे पालन करत श्रीदेवी महाकाली देवस्थानने यावर्षी मंदिरांतर्गत सर्व धार्मिक विधी देवस्थान व पुजाऱ्यांतर्फे करण्याचा निर्णय घेतला आहे.नवरात्रोत्सवानिमित्त रात्री मंदिरात आरती केली जाते. त्यानंतर देवीची पालखी प्रदक्षिणेसाठी बाहेर पडते. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर असतात. पण, यावर्षी गर्दी टाळण्यासाठी पालखीसोबत मोजक्याच भाविकांनी उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या सावटामुळे इतिहासात प्रथमच नवरात्रोत्सवात देवीचे मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे.असे होणार कार्यक्रम

  • घट बसविणे : सकाळी १० वाजता
  • घटाची आरती : दुपारी ३ वाजता
  • प्रवचन : सायंकाळी ७.३० वाजता
  • गायन : ८.३० वाजता
  • पालखी प्रदक्षिणा : रात्री ९.३० वाजता.

करमणुकीचे कार्यक्रम रद्दनवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. स्थानिक कलावंतांचा यामध्ये सहभाग असतो. कोरोनामुळे हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.अशी राहणार उपस्थिती

  • आरतीसाठी ५ माणसे
  • पालखीचे भोई २०
  • अब्दागिर २
  • ढोल २

नवरात्रोत्सव साजरा करण्याबाबत अजून गोंधळाचे वातावरण आहे. शासन मंदिरे खुली करण्याबाबत विचार करत आहे. तरीही आडिवरे येथील देवस्थानने शासनाच्या नियमांचे पालन करूनच उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. भाविकांनी गर्दी न करता दूरूनच हात जोडून नमस्कार करावा.- विश्वनाथ शेट्ये, अध्यक्ष श्री महाकाली देवस्थान.

टॅग्स :Navratriनवरात्रीRatnagiriरत्नागिरी